शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुकमा जिल्ह्यात CRPF च्या जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला; एक जवान शहीद, एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 12:19 IST

रविवारी जगरगुंडा येथील बेद्रे कॅम्पजवळ नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. जगरगुंडा येथील बेद्रे भागात नक्षलवाद्यांनी ही घटना घडवली. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी जगरगुंडा येथील बेद्रे कॅम्पजवळ नक्षलवाद्यांनी हल्ला केला. सर्च ऑपरेशनसाठी निघालेल्या जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफ 165 व्या बटालियनचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी शहीद झाले आणि कॉन्स्टेबल रामू हे गोळी लागल्याने जखमी झाले. जखमी रामू यांना प्राथमिक उपचार करून हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशनदरम्यान जवानांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर सुरक्षा दल आजूबाजूच्या भागात सखोल सर्च ऑपरेशन राबवत आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलाचे जवान सहभागी आहेत.

राज्यात आठवडाभरात सहा नक्षलवादी हल्ले झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून ५० हून अधिक आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भूसुरुंगाचा स्फोट केला होता. या स्फोटात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. हा जवान उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, परतापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सदकटोला गावात हा स्फोट झाला. बीएसएफ आणि जिल्हा पोलिस दलाचे जवान संयुक्तपणे गस्त घालत होते. याचदरम्यान हा स्फोट झाला. यापूर्वी नारायणपूरमध्येही नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. छत्तीसगड निवडणुकीपूर्वी कांकेरमध्येच नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. 

पोलिसांचा खबरी समजून हत्या निवडणुकीदरम्यान, विजापूर जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी एका ४० वर्षीय तरुणाची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केली होती. ७ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर न जाण्याचा इशाराही नक्षलवाद्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी मृताचे नाव मुचकी लिंगा असल्याचे सांगतिले होते. नक्षलवाद्यांनी त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह विजापूर जिल्ह्यातील गलगाम आणि नदापल्ली गावांदरम्यान रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी लिंगा याच्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस