सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये पटेल यांची दुसरी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:46 AM2022-12-11T05:46:56+5:302022-12-11T05:47:14+5:30

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

Sukhwinder Singh Sukkhu the new Chief Minister of Himachal; Patel's second innings in Gujarat | सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये पटेल यांची दुसरी इनिंग

सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये पटेल यांची दुसरी इनिंग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंह सुक्खू यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड निश्चित झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथील सुखविंदर सिंह सुक्खू (५८) यांचे नाव पक्षनेतृत्वाने मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले आहे. नवीन मुख्यमंत्री रविवारी शपथ घेणार आहेत. 

गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळविणाऱ्या भाजपचे मुख्यमंत्री पुन्हा भूपेंद्र पटेल (६०) हेच राहतील हे आता स्पष्ट झाले आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शनिवारी पटेल यांची निवड करण्यात आली. १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. हॅलिपॅड मैदानावर शपथविधी सोहळा होणार असल्याचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sukhwinder Singh Sukkhu the new Chief Minister of Himachal; Patel's second innings in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.