सुखोई-30 लवकरच वायुदलात परतणार
By Admin | Updated: November 15, 2014 02:42 IST2014-11-15T02:42:41+5:302014-11-15T02:42:41+5:30
भारताचे अग्रणी लढाऊ विमान सुखोई-3क् हे आठवडाभरात हवाई दलात परतणार असल्याची माहिती हवाईदलप्रमुख अरूप राहा यांनी शुक्रवारी दिली.

सुखोई-30 लवकरच वायुदलात परतणार
नवी दिल्ली : भारताचे अग्रणी लढाऊ विमान सुखोई-3क् हे आठवडाभरात हवाई दलात परतणार असल्याची माहिती हवाईदलप्रमुख अरूप राहा यांनी शुक्रवारी दिली. पुण्याजवळ अपघात झाल्यानंतर या विमानांना हंगामी स्वरूपात ताफ्यातून हटविण्यात आले होते.
या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या निष्कर्षाला अंतिम रूप देण्यात आले आहे. 2क्क्9 नंतर प्रथमच रशियन बनावटीचे हे लढाऊ विमान सर्वाधिक काळ सेवेतून बाहेर राहिले.
या विमानांच्या विक्रीनंतर रशियाकडून सहकार्य मिळणार काय? यावर ते म्हणाले की, सुखोई-3क् हा मोठा आणि जटिल असा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत रशियाकडून 27क् पेक्षा जास्त विमाने खरेदी केली जातील. या विमानाला अंतिम आकार देण्यात हवाई दलाचा सहभाग राहिला आहे. आम्ही खूप काही दिले असून त्यात स्वदेशी आणि अन्य स्नेतांचा वाटा आहे. त्यामुळेच हा प्रकल्प गुंतागुंतीचा बनला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4अपघातानंतर किमान तीन आठवडय़ांसाठी ते ताफ्यातून हटविण्यात आले होते. आसनव्यवस्थेतील त्रुटीमुळे पुण्याजवळ 14 ऑक्टोबर रोजी अपघात झाल्याचे आढळून आले. निष्कर्षाला अंतिम रूप दिले जात आहे, लवकरच ते सेवेत रुजू होईल, असे ते म्हणाले.
4 हे विमान सेवेत रुजू होण्यास किती वेळ लागेल, असे विचारण्यात आले असता त्यांनी एक आठवडय़ातच ते उड्डाण करेल, असे सांगितले.