शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्या चित्त्यांना बोचणार नाहीत काटे; महाराष्ट्राच्या ग्रासमॅनची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 05:57 IST

२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता.

 नरेंद्र जावरेमेळघाट (जि. अमरावती) : मेळघाटातील ‘ग्रासमॅन’ प्रा. गजानन मुरतकर यांनी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलातील उजाड प्रदेशात २०१३ ते २०१९ अशी सलग सात वर्षे परिश्रम घेऊन व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नामिबियामधून आलेल्या चित्त्यांसाठी योग्य कुरणक्षेत्र तयार केले आहे. याच मऊ गवतावर आता चित्त्यांची पावले पडणार आहेत. 

२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आवश्यक कुरणक्षेत्र तयार करण्याचे काम सुरू झाले होते. तेव्हा शुष्क पानझडीचे हे जंगल होते. परंतु, सिंह सोडण्याची योजना रद्द झाली. मात्र, कुरणक्षेत्र तयार झाल्यानंतर चित्त्यांसाठी योग्य वातावरणनिर्मिती तपासण्यात आली. देशातील १४पेक्षा अधिक राज्यांमध्ये गवती कुरण तयार करण्याचा अनुभव असलेले मेळघाटातील ग्रासमॅन प्रा. गजानन मुरतकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. 

तिन्ही ऋतूंमध्ये कुनो पालपूरचे वातावरण चित्त्यांसाठी उत्कृष्ट आहे. डेहराडून व इतर सर्व संस्थांनीसुद्धा तसा अहवाल दिला. कुरणक्षेत्र सर्वाधिक प्रमाणात विकसित झाले आहे. तृणभक्षी प्राण्यांची मुबलक संख्या व नदी असल्याने पाहुणा चांगला स्थिरावणार, यात दुमत नाही.  - प्रा. गजानन मुरतकर, ग्रासमॅन, मेळघाट

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलाशी कुनो पालपूर अभयारण्याचा परिसर मिळताजुळता असल्याचे आढळून आले आहे. गवा वगळता सर्व तृणभक्षी प्राणी असलेले कुनो हे देशातील पहिले अभयारण्य आहे. बोरीची काटेरी झाडे विपुल होती. कुरणक्षेत्र तयार करण्यात ते मोठे आव्हान होते. बोरीचे काटे चित्त्याच्या पायात रुतून जखमा होऊ नयेत म्हणून बोरीची झाडे पूर्णतः काढली गेली.