'सूट बूट की सरकार' - 'अरहर मोदी' या आहेत राहुल गांधींच्या घोषणा
By Admin | Updated: July 28, 2016 19:18 IST2016-07-28T19:13:43+5:302016-07-28T19:18:37+5:30
संसदेत उपस्थितांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी ते जाणूनबुजून मोदींविरोधात टीकात्मक घोषणा करत असल्याची चर्चा आहे.

'सूट बूट की सरकार' - 'अरहर मोदी' या आहेत राहुल गांधींच्या घोषणा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या संसदेत प्रसिद्धीपासून काहीसे दूर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे संसदेत उपस्थितांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी ते जाणूनबुजून मोदींविरोधात टीकात्मक घोषणा करत असल्याची चर्चा आहे. 'फेअर अँड लव्हली' आणि 'सूट बूट की सरकार'नंतर आता त्यांनी मोदी सरकारविरोधात नवी घोषणा शोधून काढली आहे.
डाळ आणि वाढत्या महागाईवर मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी 'अरहर मोदी' अशी घोषणा दिली आहे. हर हर मोदींऐवजी त्यांनी चक्क 'अरहर मोदी' अशी घोषणा दिल्यानं उपस्थितांमध्ये ते चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या 4 महिन्यांपूर्वीपासून वाढलेल्या तूरडाळीच्या किमती आणि महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी या घोषणा दिल्या आहेत.
गावागावातील लोक आता हर हर मोदीऐवजी 'अरहर मोदी अरहर मोदी' नव्या घोषणेचा जप करत असल्याची टीका राहुल गांधींनी लोकसभेत केली आहे. मोदी सरकारच्या काळात डाळींची किंमतही 120 टक्क्यांनी वाढल्याचं यावेळी राहुल गांधींनी सांगितलं आहे.