शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान केंद्र सरकारच्या काळात वाढल्या आत्महत्या; ९,५२,८७५ लोकांनी संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:46 IST

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या ...

- शीलेश शर्मानवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या सहा वर्षांत शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, शेतमजूर आणि गृहिणी व रोजंदारी मजुरांसह ९,५२,८७५ लोकांनी  आत्महत्या केल्या, असे   राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात म्हटले आहे.

एनसीआरबीच्या या खळबळजनक अहवालावरून काँग्रेसनेकेंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आत्महत्या करण्यास विवश झाले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी कोणत्या कारणामुळे या लोकांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, त्याचाही पाढा वाचला. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे देशातील अनेक राज्यांतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. याला केंद्राची धोरणे जबाबदार असल्याची टीकाही केली आहे.

काँग्रेसने केली सरकारवर टीका

काँग्रेसच्या आरोपानुसार २०१४ च्या तुलनेत २०२० मध्ये   १६ टक्के प्रेमीलोकांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १,५२,१२७ आहे. लोकांची स्थिती सुधारण्याएवेजी  सरकार लोकांना मृत्यूचा मार्ग पत्करण्यास भाग पाडण्याचे धोरण राबवित आहे, हे देशासाठी धोकादायक संकेत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस