कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

By Admin | Updated: July 19, 2015 21:22 IST2015-07-19T21:22:06+5:302015-07-19T21:22:06+5:30

भिवंडी : तीन महिन्यांपूर्वी मुलाच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न आल्याने जू-नांदुर्खी या गावातील दशरथ मोतीराम म्हात्रे (५२) या शेतकर्‍याने घराजवळील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मे महिन्यात त्यांनी कर्ज घेतले होते. ते कसे फेडावे, या विवंचनेत असताना शेवटी कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. याबाबत, तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Suicides of Debtor Farmer | कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

वंडी : तीन महिन्यांपूर्वी मुलाच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न आल्याने जू-नांदुर्खी या गावातील दशरथ मोतीराम म्हात्रे (५२) या शेतकर्‍याने घराजवळील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मे महिन्यात त्यांनी कर्ज घेतले होते. ते कसे फेडावे, या विवंचनेत असताना शेवटी कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. याबाबत, तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suicides of Debtor Farmer