्र्र्र्र्रविवाहादिवशीच युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: May 12, 2014 21:54 IST2014-05-12T21:54:34+5:302014-05-12T21:54:34+5:30

ढेबेवाडी : बागलवाडी-काढणे, ता. पाटण येथील युवतीने सोमवारी सकाळी विवाहादिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमा वसंत बागल (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

Suicide by taking a rape of a woman on the Divya Divas | ्र्र्र्र्रविवाहादिवशीच युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

्र्र्र्र्रविवाहादिवशीच युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

बेवाडी : बागलवाडी-काढणे, ता. पाटण येथील युवतीने सोमवारी सकाळी विवाहादिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमा वसंत बागल (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलवाडी येथील सीमा बागल या युवतीचा विवाह घारेवाडीतील युवकाशी ठरविण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता. आज (सोमवार) दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी कोळे येथील एका मंदिरात हा विवाह सोहळा होणार होता. बागल कुटुंबीयांकडून विवाहाची तयारी करण्यात आली होती. नातेवाइक व पै-पाहुण्यांना पत्रिकाही पाठविल्या होत्या. रविवारी इतर विधी व गावदेव करण्यात आले. सोमवारी सकाळी विवाहस्थळी जाण्यासाठी बागल कुटुंबीयांची गडबड सुरू होती. त्यावेळी सकाळी नऊच्या सुमारास सीमा घरामध्ये नसल्याचे काही नातेवाइकांच्या निदर्शनास आले. नातेवाइकांनी शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेडमध्ये आड्याला तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाइक व ग्रामस्थांनी तिला उपचारार्थ तातडीने रूग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे.
फोटो - १२०५२०१४सातारा-सीमा बागल

कॅप्शन - मृत सीमा बागल

Web Title: Suicide by taking a rape of a woman on the Divya Divas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.