पोलीस हवालदाराची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या * विमलाबाई गरवारे प्रशाला : दहावी परीक्षा बंदोबस्तावर असताना केली आत्महत्या

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:26+5:302015-03-06T23:07:26+5:30

फोटो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये शेख नावाने

Suicide by shooting a cops in the head of the constable * Vimlabai Garware School: committed suicide on the 10th standard | पोलीस हवालदाराची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या * विमलाबाई गरवारे प्रशाला : दहावी परीक्षा बंदोबस्तावर असताना केली आत्महत्या

पोलीस हवालदाराची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या * विमलाबाई गरवारे प्रशाला : दहावी परीक्षा बंदोबस्तावर असताना केली आत्महत्या

टो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये शेख नावाने
पुणे : दहावीच्या परिक्षेच्या बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस हवालदाराने वैयक्तिक कारणातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास प्रभात रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये घडली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच ही घटना घडल्यामुळे पुणे शहर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आदमअली चॉंद शेख (वय ४४, रा. पोलीस वसाहत, सोमवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. परिमंडल एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख ९ डिसेंबर १९८० रोजी पुणे शहर पोलीस दलामध्ये भरती झाले होते. त्यांनी यापुर्वी बंडगार्डन पोलीस ठाण्यात काम केलेले होते. सध्या ते पोलीस मुख्यालयामध्ये नेमणुकीस होते. त्यांना दहावीच्या परिक्षेचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये त्यांची ड्युटी होती. शाळेच्या पेपर ठेवण्याच्या स्ट्रॉंग रुमशेजारील एका छोट्या खोलीमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था होती. शाळेच्या सुरक्षा रक्षक जयश्री उत्तम झेंडे यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी उठल्यावर साडेआठच्या सुमारास शेख बाहेर जाऊन चहा पिऊ न आले. त्यांची मोटारसायकल स्वच्छ करुन ते खोलीबाहेर बसलेले होते.
साधारणपणे नऊच्या सुमारास शेख खोलीमध्ये गेले. तेथील खुर्चीवर बसून त्यांनी एसएलआर (सेल्फ लोडींग रायफल) बंदुक स्वत:च्या हनुवटीखाली धरली. बंदुचाकीचा चाप ओढून स्वत:वर गोळी झाडून घेतली. हनुवटी खालून घुसलेली गोळी डोक्यामधून बाहेर येत छताला धडकून पुन्हा जमिनीवर आदळली. दिवसपाळी असलेले पोलीस हवालदार कृष्णा गायकवाड हे शेख यांना सोडण्यासाठी आले. गाडी लावून खोलीमध्ये गेले असता त्यांना शेख यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांनी शाळेचा सुरक्षारक्षक असलेल्या भट यांच्यासह समोरच्या डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले यांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अतिरीक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त एम. बी. तांबडे, सहायक पोलीस आयुक्त रमेश गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक प्रविण चौगुले यांनी घटनास्थळाला भेट दिली. शेख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.
-----
शेख यांच्यावर २०१० मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. शेख मधल्या काळामध्ये निलंबीत होते. निलंबन मागे घेतल्यावर ७ एप्रिल २०१४ रोजी ते पुन्हा सेवेत हजर झाले होते. त्यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील भोई शिरवळ आहे. त्यांच्या मागे पत्नी कुरेशा, मुलगा शोएब (२२) आणि मुलगी असा परीवार आहे.
-----
राज्यात गेल्या चार वर्षात १२९ पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी आत्महत्या केली आहे. कौटुंबिक समस्या, ताणतणाव, आजारपण, व्यसनाधिनता आदी कारणांमधून झालेल्या या आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण मुंबई, नागपुर आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे आहे.

Web Title: Suicide by shooting a cops in the head of the constable * Vimlabai Garware School: committed suicide on the 10th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.