पोलिसाच्या कुटुंबाची धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या
By Admin | Updated: May 25, 2016 17:03 IST2016-05-25T17:03:51+5:302016-05-25T17:03:51+5:30
दिल्ली पोलिस दलातील पोलिस निरीक्षकाच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी धावत्या ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

पोलिसाच्या कुटुंबाची धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. २५ - दिल्ली पोलिस दलातील पोलिस निरीक्षकाच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी धावत्या ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शामली भागात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली.
क्रिष्ण पाल यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी मुनेश, २३ वर्षाचा मुलगा धीरज आणि २१ वर्षाची मुलगी लुना २१ मे पासूनच बेपत्ता होते अशी माहिती सर्कल ऑफीसर निशांक शर्मा यांनी दिली.
तिघांनी मंगळवारी आत्महत्या केली. रेल्वे रुळावर त्यांचे मृतदेह सापडले. काश्मिरी गेट पोलिस स्थानकात तैनात असलेल्या क्रिष्ण पाल यांनी २१ मे रोजीच कुटुंबिय बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले ते समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत