सातार्‍यात मायलेकींची विहिरीत आत्महत्या

By Admin | Updated: February 29, 2016 02:14 IST2016-02-29T02:14:35+5:302016-02-29T02:14:35+5:30

Suicide of Maeleckin's well in Satara | सातार्‍यात मायलेकींची विहिरीत आत्महत्या

सातार्‍यात मायलेकींची विहिरीत आत्महत्या

>उंब्रज (जि. सातारा) : येथील एका विहिरीत छाया अशोक खिलारे (३७) व मोनिका अशोक खिलारे (१४, रा. चरेगाव, ता. कर्‍हाड) या मायलेकींनी आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी करीत आहेत.
उंब्रज येथील गाडीगोंड शिवारातील एका विहिरीत दोन मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोघींची ओळख पटली. छाया यांचे पती अशोक खिलारे हे ट्रकचालक आहेत. काही वर्षांपूर्वी ते चरेगावहून उंब्रज येथे वास्तव्यास आले. सध्या ते उंब्रज येथे भाड्याने खोली घेऊन राहत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे तर दुसरी मुलगी मोनिका ही नववीमध्ये शिकत होती. खिलारे हे दोन दिवसांपूर्वी ट्रक घेऊन गुजरातला गेले आहेत. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide of Maeleckin's well in Satara