शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Suicide Attempt: सुप्रीम कोर्टाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 16:08 IST

Suicide Attempt: सुप्रीम कोर्टाच्या गेट नंबर-1 बाहेर नोएडाचे रहिवासी असलेल्या राजभर गुप्ता यांनी आत्महदनाचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. अंगावर रॉकेल ओतून व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. पण, तिथे उपस्थित लोकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ त्या व्यक्तीला लागलेली आग विझविली आणि त्याचा जीव वाचला. सध्या जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजभर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 1 जवळ पोहोचून अचानक रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. राजभर यांनी स्वत:ला पेटवून घेताच परिसरात खळबळ उडाली. आगीचे लोळ पाहून काही लोक घाबरले. त्याचवेळी गेटवर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत राजभर मोठ्या प्रमाणात जळाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला

पीडित व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. राजभर गुप्ता असे आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो नोएडा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने आत्मदहनाचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी राजभर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस आता राजभरच्या कुटुंबीयांचीही चौकशी करत आहेत. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस