आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा रद्द करणार
By Admin | Updated: August 7, 2014 02:17 IST2014-08-07T02:17:29+5:302014-08-07T02:17:29+5:30
गेल्या 15क् वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात असलेला ‘आत्महत्येचा प्रयत्न करणो’ हा गुन्हा भारतीय दंड विधानातून काढून टाकण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या

आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा रद्द करणार
>नवी दिल्ली : गेल्या 15क् वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात असलेला ‘आत्महत्येचा प्रयत्न करणो’ हा गुन्हा भारतीय दंड विधानातून काढून टाकण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या असून तसे झाल्यास जीवनाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणा:या परंतु त्यात अपयश आल्याने अधिकच निराश होणा:या अभागी व्यक्तींच्या डोक्यावरची तुरुंगवासाची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे.
भारतीय दंड विधानाच्या कलम 3क्9 अन्वये आत्महत्येचा प्रयत्न करणो हा गुन्हा असून तो सिद्ध झाल्यास एक वर्षार्पयत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. विधी आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार दंड विधानातील कलम 3क्9 हे कलम काढून टाकण्यासाठी गृह मंत्रलयाने प्रक्रिया सुरु केली आहे, असे गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले.
स्वत:हून मरण पत्करणो हा नागरिकांच्या जगण्याच्या मुलभूत हक्काचाच भाग आहे, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा घटनाबाह्य ठरवून रद्द केला होता. मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल खटला भरला गेलेल्या एका दाम्पत्याने, मरण त्यानेच स्वीकारले होते, आम्ही फक्त त्यात त्याला मदत केली, असा यशस्वी युक्तिवाद केल्यानंतर दोन वर्षानी हा गुन्हा दंड विधानात पुन्हा समाविष्ट केला गेला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4आत्महत्येचा प्रयत्न करणो हा गुन्हा रद्द करण्याची शिफारस विधी आयोगाने सहा वर्षापूर्वी केली होती. मुळात काहीही करून स्वत:चा जीव वाचविणो ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. परंतु ही प्रवृत्तीही गौण ठरेल अशा पराकोटीच्या नैराश्येने ग्रासल्याने माणूस जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करतो तेव्हा त्यासाठी त्याला दंडित करणो म्हणजे त्याच्या दु:खाला डागण्या देण्यासारखे आहे, असे विधी आयोगाने ही शिफारस करताना म्हटले होते.