शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:39 AM

पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले

श्रीनगर : पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन अतिरेकी ठार झाले.गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे २च्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणाºया सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ््यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.तळाच्या आवारात घुसलेले अतिरेकी नंतर गोळीबार करत प्रशासकीय इमारतीच्या आश्रयास गेले. तोपर्यंत सीआरपीएफच्या स्वत:च्या जवानांखेरीज जम्मू-काश्मीर पोलीस आणि विशेष पथकाची कुमक आली. अतिरेकी लपलेल्या इमारतीस वेढा घातला गेला. सायंकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी अधून-मधून गोळीबार सुरू होता. दोन अतिरेक्यांना खिंडीत गाठून ठार करण्यात यश आले. घुसलेला तिसरा अतिरेकी न सापडल्याने, संध्याकाळपर्यंत तळाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू होती.हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. देशविरोधी शक्तींना भारताची भीती राहिलेली नाही, हेच अशा पुन्हा-पुन्हा होणाºया हल्ल्यांवरून दिसते. मोदींना देशाच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंविरुद्ध कणखर पावले उचलावीत. देशाच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचा अशा उपायांना पाठिंबाच राहील.-सुश्मिता देव, प्रवक्त्या, काँग्रेसशहिदांचे सांडलेले रक्त कामी येत आहे. ताल्हा रशीद, मोहम्मदभाई, कमांडर नूर मोहम्मद तंतरे आणि काश्मीरचे अन्य शहिदांचे वारस अजूनही शिल्लक आहेत. भारताचा शेवटचा सैनिक काश्मीर सोडून निघून जाईपर्यंत, असे हल्ले सुरूच राहतील.- जैश-ए-मोहम्मद (जबाबदारी स्वीकारतानाचे निवेदन)सीमेपलीकडून सशस्त्र दहशतवादी पाठविणे पाकिस्तान थांबविणार नाही, तोपर्यंत काश्मीरच्या जनतेला व सुरक्षा दलांना अशा घटनांना सामोरे जाणे टळणार नाही.- एस. पी. वैद, पोलीसमहासंचालक, जम्मू-काश्मीर

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश ए मोहम्मदJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला