ऊस तोडणी, वाहतुकीसाठी अनामत 3 लाख बबनराव शिंदे: विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा उपक्रम

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

टेंभुर्णी: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सन 2015-16 हंगामासाठी गाळप क्षमतेएवढी र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. त्यांना ऊस तोडणी वाहतुकीसाठी प्रति वाहन 3 लाख रूपये अनामत वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.

Sugarcane chopped, 3 lakhs for transportation. Babanrao Shinde: Vitthalrao Shinde factory initiative | ऊस तोडणी, वाहतुकीसाठी अनामत 3 लाख बबनराव शिंदे: विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा उपक्रम

ऊस तोडणी, वाहतुकीसाठी अनामत 3 लाख बबनराव शिंदे: विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा उपक्रम

ंभुर्णी: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सन 2015-16 हंगामासाठी गाळप क्षमतेएवढी र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. त्यांना ऊस तोडणी वाहतुकीसाठी प्रति वाहन 3 लाख रूपये अनामत वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.
कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदारांची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. चालू होणार्‍या गाळप हंगामात र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. मागील हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये दुष्काळी स्थिती असल्याने मोठय़ा प्रमाणात ऊस तोडणी मजूर कामासाठी आल्याने अतिरिक्त ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा कामावर हजर होती, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.
2015-16 हंगामामध्ये कारखान्याने 22 लाख मे. टन ऊस गळिताचे उद्दिष्ट ठेवले असून, गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होण्यासाठी आवश्यक तेवढी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार असून, यासाठी 3 लाख रूपये अनामत देण्यात येणार आहे. यामध्ये पहिला हप्ता दीड लाख, दुसरा एक लाख, अंतिम हप्ता 50 हजार देण्यात येणार आहे, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे, मुख्य शेतकरी अधिकारी एस. पी. थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम. आर. भादुले, शेतकरी अधिकारी एस. एस. बंडगर उपस्थित होते.
आरोग्यासाठी संचित निधी
ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, चालकांना अपघात, सर्पदंश झाल्यास दवाखाना खर्चासाठी व मयत झाल्यास वारसांना मदत करण्यासाठी आपत्कालीन निधी संचित करण्यात येणार आहे. ऊस तोडणी वाहतुकीचे करार 15 जुलैनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Sugarcane chopped, 3 lakhs for transportation. Babanrao Shinde: Vitthalrao Shinde factory initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.