आयातशुल्क वाढल्याने साखर होणार महाग

By Admin | Updated: June 23, 2014 18:54 IST2014-06-23T15:46:39+5:302014-06-23T18:54:27+5:30

केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेल्याने आता साखर महागण्याची शक्यता आहे.

Sugar will be expensive due to increase in import duty | आयातशुल्क वाढल्याने साखर होणार महाग

आयातशुल्क वाढल्याने साखर होणार महाग

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २३ - रेल्वे दरवाढीच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या जनतेला साखर महाग होणार असल्याच्या बातमीने आणखी एक मोठा धक्का बसला. केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे आता साखर महागण्याची शक्यता आहे. साखरेवरील आयातशुल्क १५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केल्यामुळे  साखरेचे भाव तीन ते चार रूपये प्रतिकिलोने वाढणार आहेत. 
सरकारने हा निर्णय देशातील साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी घेतला असला तरी यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. साखर कारखान्यांना साखरेच्या निर्यात दरावरील सूट सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे पासवान यांनी सांगितले. तसेच शेतक-यांचे देणे कारखानदारांना देता यावे, यासाठी सरकार ४ हजार ४०० कोटी रुपयांचे बिनव्याजी अतिरिक्त कर्ज देण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Sugar will be expensive due to increase in import duty