मंगल क्वॉलिटीचे साखरमिर्शित, अप्रमाणित दूध
By Admin | Updated: December 19, 2014 00:18 IST2014-12-18T22:39:38+5:302014-12-19T00:18:54+5:30
अन्न व औषध प्रशासन: दंड व गुन्हा दाखल करूनही सुधारणा होईना

मंगल क्वॉलिटीचे साखरमिर्शित, अप्रमाणित दूध
अन्न व औषध प्रशासन: दंड व गुन्हा दाखल करूनही सुधारणा होईना
सोलापूर: मंगल क्वॉलिटी फूड प्रॉडक्ट्स कुडरूवाडी, पंढरपूर तसेच सांगोल्याच्या प्रकल्पाचे दूध साखरमिर्शित व अप्रमाणित आढळले आहे. परवाना निलंबित व दोन वेळा दंड झाल्यानंतरही सुधारणा न झाल्याने आता परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी सांगितले.
जिल्?ात दुधाचा महापूर आला असताना कृत्रिम व अप्रमाणित दुधाचेही प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असल्याचे वारंवारच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने दुधाच्या घेतलेल्या नमुन्यात बहुतेक नमुने अप्रमाणित आढळले आहेत. मंगल क्वॉलिटी फूड प्रॉडक्ट्सच्या कुडरूवाडी व पंढरपूर येथील युनिटचे दूध प्रत्येकी दोन वेळा तर सांगोला येथील युनिटचे दूध एक वेळा तपासणीसाठी घेतले होते.
0 अन्नसुरक्षा अधिकारी प्रकाश यादव यांनी 18 जानेवारी 13 रोजी कुडरूवाडी युनिटच्या घेतलेल्या नमुन्यात साखर आढळल्याने एक लाखाचा केला दंड.
0 अन्नसुरक्षा अधिकारी रामचंद्र भरकड यांनी 6 ऑगस्ट 14 रोजी पंढरपूर येथील घेतलेल्या नमुन्यात साखर आढळल्याने एक लाखाचा दंड.
0 सांगोला येथील वामा चिलिंग सेंटरचा ऑगस्ट 14 रोजी घेतलेला नमुना अप्रमाणित आढळल्याने कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव.
0 अन्नसुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी घेतलेल्या पंढरपूर येथील नमुन्यात साखर आढळल्याने 15 दिवस परवाना निलंबित केला होता, पुढील कारवाई सुरू.
0 17 नोव्हेंबर रोजी कुडरूवाडी येथील सेंटरच्या नमुन्यात साखर आढळली, कारवाई सुरू.
कोट
या दूध प्रकल्पाचा परवाना नवनीत गोविंदलाल काकाणी यांच्या नावे असून मंगल व वामा दूध सेंटरच्या वारंवारच्या तपासणीत अप्रमाणित दूध आढळले आहे. गुन्हा तर दाखल झाले व होणार आहेत. परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे.
किशोर गोरे
सहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन)
चौकट
हॉटेल ‘दुर्गा’ व ‘विकास’ला नोटीस
सोलापूर शहरातील रेल्वेलाईन्स परिसरातील ‘विकास’ हॉटेल व लकी चौकातील हॉटेल ‘दुर्गा’ची तपासणी अन्नसुरक्षा अधिकारी नीलेश मसारे यांनी केली असता अस्वच्छता आढळली. हॉटेलमधील किचनरुम व हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याने नोटीस बजावण्यात आली. फेरतपासणीत सुधारणा झाली नाही तर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) किशोर गोरे यांनी सांगितले.