पुढील हंगामात साखर कारखाने बंद ठेवणार
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:27+5:302015-07-10T23:13:27+5:30
एफआरपी देणे अशक्य : खासगी कारखानदारांच्या संघटनेचा इशारा

पुढील हंगामात साखर कारखाने बंद ठेवणार
ए आरपी देणे अशक्य : खासगी कारखानदारांच्या संघटनेचा इशारासोलापूर: बाजारातील साखरेचे घसरलेले दर सावरत नसल्याने एफआरपीप्रमाणे दर देणे अशक्य आहे. केंद्र व राज्य शासन आडमुठे धोरण स्वीकारत असल्याने पुढील हंगामात कारखाने एकजुटीने बंद ठेवण्यात येतील, असा इशारा खासगी साखर कारखानदार संघटनेच्या वतीने (विस्मा) पत्रकार परिषदेत देण्यात आला.राज्यातील साखर कारखानदारी सध्या मोठ्या अडचणीत आहे. यामुळे राज्यातील ८७ खासगी साखर कारखानदारांची बैठक पुणे येथे ५ जुलै रोजी झाली. यामध्ये चर्चेअंती निर्णय घेण्यात आला. साखरेचे दर १९०० रुपयांवर आले असताना एफआरपी देणे एकाही कारखान्याला शक्य नसल्याचे विस्मा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.------------ मागील ५ वर्षांत उत्पादन वाढीमुळे अतिरिक्त साखरेचे भाव ४० टक्क्यांनी कमी झाले तर एफआरपीचे दर केंद्राने ७० टक्क्यांनी वाढविले़- २०१४-१५ च्या हंगामासाठीची ऊस देयके शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे देणे अशक्य आहे- ऑक्टोबर १४ ते आजअखेर साखरेचा दर ८०० रुपयांनी घसरला- कृषीमूल्य आयोगाच्या व सी.रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार एफआरपीनुसार रक्कम केंद्र व राज्य शासनाने थेट शेतकर्यांना द्यावी- शासनाने कायदेशीर कारवाई केल्यास सर्व कारखानदार एकजुटीने सामोरे जातील - वाढत्या उत्पादनाचा विचार करुन २० टक्के साखर निर्यात करावी व त्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवावे--------१५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात२०१५-१६ च्या हंगामात एफ.आर.पी. व रंगराजन समितीच्या सूत्रानुसार एकूण उत्पन्नाच्या ७० ते ७५ टक्के ऊस यातील फरक केंद्राने कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखर किंमत स्थिरीकरण निधीतून थेट शेतकर्यांना द्यावी तसे लेखी आदेश काढले तरच हंगाम सुरू करणार असल्याचे विस्मा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे.