साखर निर्यात अनुदान वाढणार
By Admin | Updated: August 9, 2014 01:33 IST2014-08-09T01:33:25+5:302014-08-09T01:33:25+5:30
अन्न मंत्रलय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी कच्च्या साखरेवरील निर्यात अनुदान वाढवून 3,371 रुपये प्रतिटन करू शकते.

साखर निर्यात अनुदान वाढणार
>नवी दिल्ली : अन्न मंत्रलय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी कच्च्या साखरेवरील निर्यात अनुदान वाढवून 3,371 रुपये प्रतिटन करू शकते. गेल्या दोन महिन्यांसाठी हे अनुदान 3,3क्क् रुपये प्रतिटन एवढे होते.
फेब्रुवारीत तत्कालीन सरकारने 2क्13-14 आणि 2क्14-15 विपणन वर्षादरम्यान 4क् लाख टनार्पयत कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदानाची घोषणा केली होती. रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या साखर उद्योगाला ऊस शेतक:यांची देणी अदा करण्यास मदत व्हावी या उद्देशाने सरकारने ही घोषणा केली होती.
केंद्र सरकारने फेब्रुवारी-मार्च या काळासाठी अनुदानाची रक्कम 3,3क्क् रुपये प्रतिटन ठरवली होती आणि दर दोन महिन्यांचा याचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल-मे या दोन महिन्यांसाठी कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदान कमी करून 2277 रुपये प्रतिटन करण्यात आले होते. नवे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी जून-जुलै या महिन्यांसाठी निर्यात अनुदान वाढवून 33क्क् रुपये प्रतिटन केले.
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून साखरेवरील अनुदान वाढवून 3371 रुपये प्रतिटन केले जाण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या साखरेचा सरासरी भाव आणि जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात विदेशी चलनविनिमय दर यांना लक्षात घेऊन अन्न मंत्रलयाद्वारे यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4साखर उद्योगाने चालू आर्थिक वर्षात 31 जुलैर्पयत ऊस शेतक:यांची 47,852 कोटी रुपयांची देणी चुकती केली आहेत. कारखानदारांकडून अजून शेतक:यांना 9252 कोटी रुपये येणो आहेत. यात उत्तर प्रदेशातील कारखानदारांकडून 5,741.74 कोटी, कर्नाटक 1794.68 कोटी आणि तामिळनाडूत 5क्4.4क् कोटी रुपये शेतक:यांना मिळणो बाकी आहेत.