साखर 2 रुपयांनी महागली

By Admin | Updated: June 25, 2014 00:48 IST2014-06-25T00:48:18+5:302014-06-25T00:48:18+5:30

आयात शुल्कातील वाढीसह करण्यात आलेल्या विविध उपाययोजनानंतर राजधानी दिल्लीच्या ठोक बाजारात मंगळवारी साखरेच्या भावात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली.

Sugar is expensive by Rs 2 | साखर 2 रुपयांनी महागली

साखर 2 रुपयांनी महागली

>नवी दिल्ली : आयात शुल्कातील वाढीसह करण्यात आलेल्या विविध उपाययोजनानंतर राजधानी दिल्लीच्या ठोक बाजारात मंगळवारी साखरेच्या भावात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली. यामुळे साखर 33.4क् रुपये प्रतिकिलोला विकली गेली. देशातील साखर उद्योगासमोरील संकटाचा निपटारा करण्यासाठी सरकारने सोमवारीच या उपाययोजनांची घोषणा केली होती.
ठोक साखर बाजारातील संकेतांद्वारे किरकोळ भावही दोन रुपयांनी वाढून प्रतिकिलो 39.4क् रुपये झाला. व्यापा:यांनी सांगितले की, आगामी दिवसांत साखरेची चव आणखी महाग होऊ शकते. कारण, मोठय़ा नफ्याच्या आशेने साखर कारखानदार साठा बाहेर काढत नाहीत. 
ठोक बाजारात साखरेची आवक कालच्या तुलनेत 6क् टक्क्यांनी घसरली आहे. काल 13 हजार साखरेच्या पोत्यांची आवक झाली होती.
उन्हाळ्य़ात आईस्क्रीम आणि शीतपेय उत्पादकांच्या मागणीमुळेही साखरेच्या भावात तेजी राहिली. साखर कारखानदारांकडे ऊस उत्पादकांची सुमारे 11 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. साखर उद्योगासमोरील रोकड संकटाचा निपटारा करण्यासाठी सरकारने कालच साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 4क् टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला 
होता. 
याशिवाय सरकार ऊस उत्पादकांची थकबाकी चुकती करण्यासाठी 4,4क्क् कोटी रुपयांचे अतिरिक्त कजर्मुक्त व्याज देण्याचा निर्णयही घेतला आहे.
साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देताना केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत. शेतक:यांच्या ऊस बिलांची थकबाकी त्वरित देणो, ही त्यातील पहिली अट आहे. कारखान्यांनी पाच वर्षाच्या कालावधीत भरलेल्या अबकारी कराएवढे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सरकारच्या या निर्णयानंतर काल साखरेच्या ठोक विक्री दरात प्रतिकिलोमागे 6क् पैशांची वाढ झाली. भारत जगातील दुस:या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असून पहिल्या क्रमांकाचा ग्राहकही आहे.

Web Title: Sugar is expensive by Rs 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.