आसोदा येथे मारहाण
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:56+5:302016-02-02T00:15:56+5:30
जळगाव- आसोदा ता.जळगाव येथील तुकाराम भोळे, धनराज चिंधू कोल्हे, बळीराम चैत्राम कोळी, अशोक भुरा नारखेडे, किशोर चौधरी, योगेश तुकाराम भोळे, प्रदीप भोळे व संजय चिरमाडे यांनी शेतात गुरे चारताना मारहाण केल्याची तक्रार अनिल तुकाराम कोळी ह.मु.असोदा येथील अनिल तुकाराम कोळी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. कोळी यांनी म्हटले आहे की, मी पत्नी अलकाबाई, मुलगी गायत्री, पूनम व पायल, मुलगा केतन यांच्यासह सुजदे रोड, आसोदा येथे राहतो. माझ्याकडे पशुधन आहे. मी माझा चुलतभाऊ अभिमन कोळी यांच्या उक्त्याने केलेल्या शेतात २८ जानेवारी रोजी गुरे चारत होतो. त्या वेळी तुकाराम भोळे, किशोर चौधरी व इतर अशा आठ जणांनी मला मारहाण केली. माझी पत्नी त्यांना विरोध करायला आली. त्यांनी पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धनराज कोल्हेने लाकडी दा

आसोदा येथे मारहाण
ज गाव- आसोदा ता.जळगाव येथील तुकाराम भोळे, धनराज चिंधू कोल्हे, बळीराम चैत्राम कोळी, अशोक भुरा नारखेडे, किशोर चौधरी, योगेश तुकाराम भोळे, प्रदीप भोळे व संजय चिरमाडे यांनी शेतात गुरे चारताना मारहाण केल्याची तक्रार अनिल तुकाराम कोळी ह.मु.असोदा येथील अनिल तुकाराम कोळी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. कोळी यांनी म्हटले आहे की, मी पत्नी अलकाबाई, मुलगी गायत्री, पूनम व पायल, मुलगा केतन यांच्यासह सुजदे रोड, आसोदा येथे राहतो. माझ्याकडे पशुधन आहे. मी माझा चुलतभाऊ अभिमन कोळी यांच्या उक्त्याने केलेल्या शेतात २८ जानेवारी रोजी गुरे चारत होतो. त्या वेळी तुकाराम भोळे, किशोर चौधरी व इतर अशा आठ जणांनी मला मारहाण केली. माझी पत्नी त्यांना विरोध करायला आली. त्यांनी पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धनराज कोल्हेने लाकडी दांड्याने जोराद प्रहार केले. त्यात माझा डावा हात मोडला. ते जीवे ठार मारण्याची धमकी देतात. माझ्या मनात भिती आहे. या आरोपींवर गुन्हा दाखल केला जावा, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही कोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.