शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 08:01 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या माणसांसाठी मला अतीव दु:ख झाले. या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला हे खरे असले

ज्युलिओ रिबेरो

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या माणसांसाठी मला अतीव दु:ख झाले. या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला हे खरे असले, तरी ज्यांनी पूर्वी त्या सुरक्षा दलाचे नेतृत्व केले अशा माझ्यासारख्याचा शोक अंमळ अधिक तीव्र आहे. तीन वर्षांहून थोडा अधिक काळ मुंबईचा पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यानंतर काही आठवड्यांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर माझ्या सेवांची गुजरातमध्ये गरज असल्याचे पंतप्रधानांनी ठरविले.त्याआधी मधल्या फळीत ‘सीआरपीएफ’मध्ये मी हैदराबादमध्ये रेंज जीआयजी म्हणून साडेतीन वर्षे आणि दिल्लीतील मुख्यालयात अडीच वर्षे प्रशासकीय पदांवर काम केले होते. या दलातील बहाद्दर जवानांच्या उत्तम कामगिरीची ज्यांना कल्पना नाही त्यांच्या तुलनेत ज्याने या दलात सहा वर्षे घालविली, त्या माझ्यासारख्याचे अश्रू अधिक अनावर होणे स्वाभाविक आहे.

भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ यांच्यात एक मूलभूत फरक आहे. लष्कराची भरती प्रामुख्याने लढवय्या मानल्या गेलेल्या जातींच्या युवकांमधून केली जाते व त्यांच्या रेजिमेंटची रचनाही त्यानुसारच केलेली असते. ‘सीआरपीएफ’मध्ये मात्र संपूर्ण देशातून अधिक व्यापक प्रमाणावर भरती केली जाते. प्रत्येक बटालियनमध्ये सर्व राज्ये, समाजवर्ग, सर्व धर्म, सर्व जाती व सर्व भाषांना प्रतिनिधित्व मिळेल याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. त्यामुळे अशा बटालियनमधील जवानांची हिंदी किंवा हिंदुस्तानी ही सामायिक भाषा बनते आणि ते समान खाणेपिणे व समान नीतिमूल्यांचे पालन करतात. हे जवान महिनोंमहिने कुटुंबांपासून दूर व बहुतांश वेळा अत्यंत खडतर परिस्थितीत राहत असतात.

या दलातील व्यक्ती ‘सीआरपीएफ’ला ‘चलते रहो प्यारे’ अशा पर्यायी नावाने ओळखतात. याचे कारण असे की देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात अशांतता निर्माण झाली की या दलाच्या बटालियनना लगेच तेथे रवाना केले जाते. त्यामुळे या जवानांचे आयुष्य सारखे फिरतीचे असते. येथे आज्ञेचे तत्काळ पालन करण्याचे शिक्षण सुरुवातीपासूनच दिले जाते. कमीतकमी बळाचा वापर करून दहशतवादी घटना किंवा हिंसक जमावाला कसे हाताळायचे याचे विशेष प्रशिक्षण या जवानांना दिलेले असते. म्हणून पूर्वी मी ज्या दलाला माझे म्हणत होतो त्या सीआरपीएफमधील ४४ प्रशिक्षित व ध्येयनिष्ठ जवान एका ‘फिदायीनी’ने घडवून आणलेल्या स्फोटात मृत्युमुखी पडावेत, याने माझे काळीच पिळवटून गेले.

हे टाळता आले असते का? सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा ज्या रस्त्यावरून जायचा होता तो आधीच अधिक सुरक्षित करून घेता आला असता, असे अनेक जण म्हणतील. घरात आरामखुर्चीत बसून असे दोष देणे सोपे आहे. पण या लोकांना असे सांगावेसे वाटते की, असुरक्षित ठिकाणी काम करीत असताना सुरक्षा दलांचे सुरक्षित राहणे बहुधा नशिबावरही अवलंबून असते. दहशतवाद्यांना असे नशीब एकदा लाभले तरी त्यांचे काम फत्ते होऊ शकते! जीवावर उदार होऊन आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यास निघालेल्या व्यक्तीने गुप्तहेरांना चकवा दिला आणि सुरक्षा फळी भेदली की त्याला रोखणे अशक्य असते. दहशतवाद्यांकडून केले जाणारे असे निकराचे प्रयत्न आधी डझनभर वेळा फोल ठरले तरी सुरक्षा व्यवस्थेतील छोटीशी उणीवही त्यांचा तेरावा प्रयत्न यशस्वी होण्यास पुरेशी असते! त्यामुळे अशा धोकादायक परिस्थितीत काम करणाºया सुरक्षा जवानांना अहोरात्र मिनिटागणिक सतर्क राहावे लागते.खास करून सर्वसामान्य नागरिकांकडून असा दु:खावेग उत्स्फूर्त आणि जाहीरपणे व्यक्त होणे हे नक्कीच मानवी करुणेचे व देशप्रेमाचे लक्षण आहे. पण दहशतवाद व बंडखोरांच्या कारवायांमुळे काश्मीर किंवा अन्य काही ठिकाणीही विस्कळीत होणारी समाजजीवनाची घडी एवढ्यानेच सुरळीत होणार नाही. अप्रियतेचा धोका पत्करूनही मला असे सांगावेसे वाटते की, काश्मीरमधील दहशतवाद हा वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्याची हाताळणीही वेगळ्या पद्धतीनेच केली जायला हवी.पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवादाचा बीमोड करण्याचा त्या वेळचा पंजाब पोलीस दलाचा प्रमुख असलेला अनुभव, १९९८ मध्ये उत्तर आयर्लंडला गेलो असता तेथील दहशतवादाचा पोलिसांनी कसा मुकाबला केला, याची प्रत्यक्ष अधिकाºयांकडून घेतलेली माहिती याआधारे मी खात्रीने असे सांगू शकतो, की ही समस्या फक्त दंडुकेशाहीने कधीही पूर्णपणे सुटू शकणार नाही. अर्थात, हातात बंदूक घेऊन समोर येणाºया बंडखोरांची गय करून चालणार नाही, हे खरे. पण हे दहशतवादी ज्या समाजातून तयार होतात त्या समाजाचे मन जिंकण्यासाठी सोबतच काही केले नाही, तर या बंडखोर प्रवृत्तीला खतपाणी मिळतच राहील आणि एकाला मारला तर त्याच्या जागी त्याच्याहून अधिक कट्टर दहशतवादी येऊन उभा राहील. यामुळे फक्त बळाचा वापर करून हा असंतोष चिरडून टाकण्याच्या धोरणाचा फेरविचार होणे गरजेचे ठरते. एकीकडे ताकदीचा वापर करीत असतानाच दुसरीकडे स्थानिक जनतेमधील चांगुलपणाला साद घालण्याचे कामही करीत राहावे लागेल. हे करताना त्या लोकांकडे शत्रू म्हणून नव्हे, तर या देशाचे सन्मान्य नागरिक म्हणूनच पाहावे लागेल.(लेखक ज्येष्ठ निवृत्त सनदी पोलीस अधिकारी आहेत)

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला