शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोला मोठे यश, अंतराळ अपघातात प्राण वाचवू शकणाऱ्या कॅप्सूलची केली यशस्वी चाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 18:12 IST

उपग्रह आणि अंतराळ संशोधनामध्ये जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था बनलेल्या इस्त्रोने अंतराळ संशोधनामध्ये मोठे यश मिळवले आहे.

नवी दिल्ली - उपग्रह आणि अंतराळ संशोधनामध्ये जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था बनलेल्या इस्त्रोने अंतराळ संशोधनामध्ये मोठे यश मिळवले आहे. अंतराळ प्रवासात अंतराळवीरांची सुरक्षितपणे ने आण करू शकणाऱ्या कॅप्सुलची इस्त्रोने यशस्वीरीत्या चाचणी केली आहे. ही कॅप्सूल  अंतराळवीर आपल्यासोबत अवकाशात नेऊ शकतील. तसेच अंतरकाळात आणीबाणीच्या प्रसंगी तिचा वापर करता येईल. श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या तळावरून या कॅप्सुलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. अंराळ प्रवासादरम्यान झालेल्या कुठल्याही दुर्घटनेत या कॅप्सुलचा वापर करून अंतराळवीर आपले प्राण वाचवू शकतील. या चाचणी संदर्भात माहिती देताना इस्रोचे चेअरमन के. सिवान म्हणाले, क्रू बेलआऊट सिस्टिमवर कॅप्सुलची चाचणी घेण्यात आली. तसेच ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. या चाचणीदरम्यान व्यक्तीऐवजी क्रू मॉडेलचा वापर करण्यात आला. हे मॉडेल कॅप्सुलमध्ये अॅटॅच करण्यात आले होते. तसेच ही कॅप्सुल रॉकेलच्या इंजिनाला जोडून अंतराळात पाठवण्यात आली होती. त्यानंतर काही वेळाने ही कॅप्सुल सुरक्षितपणे समुद्रात निर्धारित करण्यात आलेल्या ठिकाणी उतरली.  259 सेकंद चाललेल्या या चाचणीमध्ये सर्व बाबी यशस्वी आणि ठरवल्याप्रमाणे झाल्या. अंतराळ यानात अंतराळवीरांसोबत जर काही अपघात झाला. तर त्यात अंतराळवीरांची सुरक्षितता निश्चित करणे हा ही कॅप्सुल विकसित करण्यामागचा उद्देश असल्याचे सिवाना यांनी सांगितले.  मानवाला अंतराळात पाठवण्याच्या कार्यक्रमाबाबत सिवान म्हणाले, जर आम्ही अंतराळवीरांना अंतराळात पाठवले तर त्यांना सुरक्षितपणे परत पृथ्वीवर आणण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. त्यासाठी आम्हाला या अंतराळवीरांसाठी जीवरक्षक प्रणाली विकसित करावी लागेल. ऑक्सिजनची पूर्तता, हवेचा नियंत्रित दाब, मलनिसा:रण सुविधा, तसेच अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी यानातून बाहेर येण्यास सक्षम कॅप्सूल या अशाच काही गोष्टी आहेत.  

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत