स्वदेशी ‘निर्भय’ची यशस्वी चाचणी
By Admin | Updated: October 17, 2014 23:56 IST2014-10-17T23:56:47+5:302014-10-17T23:56:47+5:30
भारताने स्वदेशनिर्मित अण्वस्त्रवाहू ‘निर्भय’ या क्रूझ क्षेपणास्त्रची शुक्रवारी चांदीपूर येथील केंद्रावरून यशस्वी चाचणी घेतली.

स्वदेशी ‘निर्भय’ची यशस्वी चाचणी
अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र : 700 किमीर्पयत मारा करण्याची क्षमता
बालासोर : भारताने स्वदेशनिर्मित अण्वस्त्रवाहू ‘निर्भय’ या क्रूझ क्षेपणास्त्रची शुक्रवारी चांदीपूर येथील केंद्रावरून यशस्वी चाचणी घेतली. ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेग असलेल्या या क्षेपणास्त्रची 7क्क् किमीपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. निर्भयच्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
निर्भयला सकाळी 1क्.क्3 वाजता इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या(आयटीआर) लाँच पॅड 3 वरून मोबाईल लाँचरद्वारे डागण्यात आले. लक्ष्य अचूक भेदण्यात यश आल्यानंतर चाचणी यशस्वी झाल्याचे एका अधिका:याने सांगितले.
या क्षेपणास्त्रने 1 तास 13 मिनिटे मार्गक्रमण करीत सर्व परिमाणांचे तंतोतंत पालन केले. रडार आणि टेलेमेट्री पॉइंटस् तसेच प्रक्षेपणपथाच्या आधारे डाटाचे विश्लेषण करण्यात आले. आयटीआरपासून 7क्क् ते 1क्क्क् किमी अंतरावर मारा करणा:या या क्षेपणास्त्रची ही दुसरी चाचणी होती. 12 मार्च 2क्13 रोजी
पहिल्या चाचणीच्या वेळी सर्व उद्दिष्टे गाठण्यात अपयश आले होते.
प्रक्षेपणपथावरून ते भरकटल्याने मध्येच त्याची चाचणी थांबविण्यात आली होती.
यापूर्वी भारत आणि रशियाने 29क् किमीचा पल्ला असलेले ‘ब्रrाोस’ हे ध्वनीपेक्षा जास्त वेग असलेले क्षेपणास्त्र विकसित केले होते. संरक्षण संशोधन आणि
विकास संघटनेने निर्भयची निर्मिती केली आहे.
(वृत्तसंस्था)
च्‘निर्भय’ आवश्यक तेवढा वेळ घेत मारा करते. त्याचे नियंत्रण चांगले असून हुकूमबरोबर मारा करण्याची क्षमता आहे.
च्लक्ष्य भेदण्याची अचूकता अधिक असून परिणामकारकताही जास्त आहे.
चड्रारच्या नजरेतून सुटण्याच्या क्षमतेमुळे गोपनीयता पाळता येते.