डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी

By Admin | Updated: November 3, 2014 10:27 IST2014-11-03T10:24:24+5:302014-11-03T10:27:36+5:30

महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगाने फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीने तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

Successful test of lancet India on dengue | डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी

डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी

>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. ३ - महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगाने फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीने तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतातही उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. 
सॅनोफी पाश्चर या कंपनीने गेल्या वर्षी डेंग्यूवर लस तयार केली होती. आशियाई देशांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच फ्रेंच कंपनीने तयार केलेली ही लस दिलासा देणारे ठरली होती. या लशीची भारतातील चाचणी नुकतीच पार पडली. यात दिल्ली, बंगळुरु, पुणे आणि कोलकाता येथील १८ ते ४५ वयोगटातील रुग्णांना ही डेंग्यूरोधक लस देण्यात आली होती. या चाचणीत ही लस भारतातही उपयुक्त ठरु शकते हे स्पष्ट झाले आहे. कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. निकोलस जॅक्सन म्हणाले, भारतात या लशीची यशस्वी चाचणी केल्यानंतर आम्ही भारतातील संबंधीत सरकारी यंत्रणांच्या संपर्कात असून लवकरच या लशीची भारतातही नोंदणी केली जाईल. आता भारतात स्वस्त दरात ही लस उपयुक्त करुन देणे गरजेचे असून यावर सरकार आणि कंपनी काय तोडगा काढते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेतील एका अहवालानुसार भारतात दरवर्षी ६० लाख डेंग्यूचे रुग्ण आढळतात. 
 

Web Title: Successful test of lancet India on dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.