अग्नि-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By Admin | Updated: January 31, 2015 11:11 IST2015-01-31T11:05:29+5:302015-01-31T11:11:50+5:30
स्वदेशी बनावटीचे,जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या 'अग्नि-५' या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी करण्यात आली.

अग्नि-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ऑनलाइन लोकमत
बालासोर, दि. ३१ - स्वदेशी बनावटीचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या 'अग्नि-५' या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशाच्या व्हीलर बेटावर शनिवारी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांच्या सुमारास अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
सुमारे ५० टन वजन असलेले हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब व २ मीटर रुंद असून त्याचा पल्ला पाच हजार किलोमीटर इतका आहे. एक टनहून अधिर वजन वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या 'अग्नि ५'चा भारतीय सैन्यदलात समावेश झाल्यावर देशाची अण्वस्त्रविरोधी क्षमता कित्येक पटींनी वाढेल.