नवी दिल्ली - भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-11 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोने या उपग्रहाची तपासणी करण्यासाठी हा उपग्रह फ्रेंच गुयाना येथून माघारी बोलावला होता. हा निर्णय GSAT-6A या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ठरल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून घेण्यात आला होता. 29 मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर GSAT-6A हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला होता. तसेच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यावेळी GSAT-11 चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर आज या उपग्रहाने अवकाशकडे यशस्वी झेप घेतली. GSAT-11 हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह असून, त्याचे सोलर पॅनल सुमारे चार मीटर एवढे मोठे आहेत. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारताती इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.
भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 08:24 IST
भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे बुधवारी रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे.
भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती
ठळक मुद्दे भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-11 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते.