दहावीतील गुणवंतांचा सत्कार विविध शाळांचे यश : जिल्‘ातील विद्यालयांनी राखली यशाची परंपरा लातूर : दहावी बोर्ड परीक्षेत जिल्‘ातील विविध शाळांनी यश संपादन करीत

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:03+5:302015-06-12T17:38:03+5:30

श्री शिवाजी विद्यालय : शहरातील सरस्वती कॉलनीतील श्री शिवाजी विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला आहे. २७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. अंजली जगताप (प्रथम), अनुजा शेळके (द्वितीय), लक्ष्मण नलवाडे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष ए.ए. काजी, व्ही.बी. जाधव, सचिव बी.पी. कोथिंबिरे, सहसचिव बी.एन. काटे, के.बी. देवकते, आर.जी. कुलकर्णी, व्ही.एच. साबदे, सी.एम. शेख, डी.जी. पिनाटे, ए.पी. रुकमे, एस.व्ही. पिचारे, मुख्याध्यापक बी.डी. पौळ, व्ही.आर. कनामे, आर.एम. खंदाडे, एस.वाय. कुलकर्णी, एम.एन. कोकळगावे, एस.जी. लखनगावे आदी उपस्थित होते.

The success of the various schools of Class X are: The tradition of the success of schools by district schools Latur: Various schools in the district achieve success in the SSC examination. | दहावीतील गुणवंतांचा सत्कार विविध शाळांचे यश : जिल्‘ातील विद्यालयांनी राखली यशाची परंपरा लातूर : दहावी बोर्ड परीक्षेत जिल्‘ातील विविध शाळांनी यश संपादन करीत

दहावीतील गुणवंतांचा सत्कार विविध शाळांचे यश : जिल्‘ातील विद्यालयांनी राखली यशाची परंपरा लातूर : दहावी बोर्ड परीक्षेत जिल्‘ातील विविध शाळांनी यश संपादन करीत

री शिवाजी विद्यालय : शहरातील सरस्वती कॉलनीतील श्री शिवाजी विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला आहे. २७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. अंजली जगताप (प्रथम), अनुजा शेळके (द्वितीय), लक्ष्मण नलवाडे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष ए.ए. काजी, व्ही.बी. जाधव, सचिव बी.पी. कोथिंबिरे, सहसचिव बी.एन. काटे, के.बी. देवकते, आर.जी. कुलकर्णी, व्ही.एच. साबदे, सी.एम. शेख, डी.जी. पिनाटे, ए.पी. रुकमे, एस.व्ही. पिचारे, मुख्याध्यापक बी.डी. पौळ, व्ही.आर. कनामे, आर.एम. खंदाडे, एस.वाय. कुलकर्णी, एम.एन. कोकळगावे, एस.जी. लखनगावे आदी उपस्थित होते.
श्री केदारनाथ विद्यालय : शहरातील जुना औसा रोड भागातील श्री केदारनाथ माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३६ टक्के लागला आहे. ८३ पैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्यासह ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रतीक सक्राळे (प्रथम), दत्तात्रय टमके (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्थाध्यक्ष ॲड.बी.एन. बंडगर, सचिव पी.एन. बंडगर, डॉ.डी.के.रुपनर, मुख्याध्यापक जी.एन. पालीमकर यांनी केले.
सिद्दीक उर्दू शाळा : शहरातील नांदेड रस्त्यावरील सिद्दीक उर्दू विद्यालयाचा निकाल ८८ टक्के लागला आहे. सय्यद उमे फिजा बडेसाब (प्रथम), निलोफर सय्यद (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक करण्यात आले.
निर्मलादेवी काळे विद्यालय : शहरातील विशाल नगरातील निर्मलादेवी काळे माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८९ टक्के लागला आहे. पूजा बंडगर (प्रथम), सिद्धेश्वर वैद्य (द्वितीय), दीपाली कुलकर्णी (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्थाचालक सुभाष काळदाते, मुख्याध्यापक एन.एन. जोशी, आर.एस. जाधव यांनी केले.
श्री श्री रविशंकर विद्यालय : शहरातील रिंग रोड येथील श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. अथर्व पाटील (प्रथम), वैष्णवी तांदळे (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक शाळेच्या वतीने करण्यात आले.
रुकय्या बेगम विद्यालय : शहरातील लेबर कॉलनी येथील रुकय्या बेगम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८०.५० टक्के लागला आहे. सय्यद अफरोजा (प्रथम), अत्तार सलमा (द्वितीय), तांबोळी रुमिसा (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्था सचिव एन.बी. शेख, संस्थाध्यक्ष अफसर शेख, मुख्याध्यापक वाय.एम. कसेरी, युसुफ शेख, जवळगे आदींनी केले.

Web Title: The success of the various schools of Class X are: The tradition of the success of schools by district schools Latur: Various schools in the district achieve success in the SSC examination.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.