शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीची जाणीव! वडील शेतकरी, आई करायची मजुरी; मुलाने IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:57 IST

हेमंतच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायला हवे होते, पण कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. एके दिवशी आईने मुलाला आपली व्यथा सांगितली.

राजस्थानमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने नेत्रदिपक कामगिरी केली आहे, त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थिती खूप बेताची होती. हेमंतच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायला हवे होते, पण कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. एके दिवशी आईने मुलाला आपली व्यथा सांगितली. कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आईला होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी त्याने कलेक्टर होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं आणि ते त्याने पूर्ण केलं आहे.

हेमंत पारिकचा जन्म राजस्थानमधील विरान तहसील भद्रा जिल्हा हनुमानगड येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि  वडील शेतकरी होते. महर्षि दयानंद हायस्कूलमधून हिंदी माध्यमातून त्याने दहावीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. हेमंतने सांगितलं की, "एक दिवस मी घरी होतो आणि आईने मला मिठी मारली आणि रडू लागली, मी विचारलं की काय झालं आई, का रडत आहेस? तेव्हा ती म्हणाली बेटा सरकार आम्हाला २२० रुपये देतं आणि इथे आम्ही दिवसभर काम करतो आणि ५०-६० रुपये मिळतात."

"मला याबद्दल खूप वाईट वाटलं आणि मी ऑफिसला पोहोचलो. काही वेळाने तिथल्या व्यवस्थापकाने मला समजावून सांगितलं की, लोकसंख्या जास्त असल्याने हे करावंच लागेल. अशाप्रकारे, जेव्हा मी त्याला एकदा रेकॉर्ड दाखवायला सांगितलं. तर त्यांच्यापैकी एक म्हणाला की, जास्त कलेक्टर बनू नकोस.... त्यावेळी मला कलेक्टर आणि कंडक्टरमध्ये काय फरक असतो हेही माहीत नव्हते. मी निराश होऊन घरी परतलो. त्याच दिवशी मी ठरवलं की एक दिवस मी कलेक्टर होणार. त्या दिवसानंतर मी UPSC-IAS ची तयारी सुरू केली आणि मला वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन मिळत राहिलं. कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात मला शिक्षक आणि इतर मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळाला."

"मी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालो आणि माझे नाव यादीत होतं. यानंतर मी मुख्य परीक्षेची तयारी केली आणि तीन महिन्यांनी माझा निकाल लागला. त्यानंतर मी पुन्हा मुलाखतीची तयारी सुरू केली. माझी मुलाखत ६ फेब्रुवारी रोजी झाली आणि १६ फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा माझं नाव त्या यादीत ८८४ व्या क्रमांकावर होतं. सततच्या कठोर परिश्रमानंतर, २०२३ च्या यूपीएससीमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक ८८४ मिळवला" असं हेमंतने सांगितलं आहे. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहेत. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी