गिरीष बापट यांच्यावरील बायपास शस्त्रक्रिया यशस्वी
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30
पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सोमवारी खासगी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. बापट यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीत त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गिरीष बापट यांच्यावरील बायपास शस्त्रक्रिया यशस्वी
प णे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सोमवारी खासगी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. बापट यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीत त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी दुपारी बापट यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. रणजित जगताप यांनी त्यांच्यावर बिटींग हार्ट तंत्राचा वापर करून शस्त्रक्रिया केली. त्यांची प्रकृती चांगली असून, त्यात सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बापट यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून पुढील चार दिवस ते कोणालाही भेटणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. ---