शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 03:55 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या प्रचंड यशामागे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नियोजन किती अचूक होते हे सिद्ध झाले.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या प्रचंड यशामागे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नियोजन किती अचूक होते हे सिद्ध झाले. हे नियोजन प्रत्यक्ष राबवले त्यांच्या विश्वासू टीमने. शहा हे लवकर कोणावर विश्वास ठेवत नाहीत व एकदा ज्याच्यावर ठेवला तर त्याच्या पाठीशी ठामपणे राहतात, असे सांगण्यात येते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे प्रमुखपद सांभाळताना आपला विश्वास मिळवलेल्या लोकांची एक गाभा समिती शहा यांनी बनवली. तीत कैलाश विजयवर्गीय, जे. पी. नद्दा, अरुण सिंह, प्रकाश जावडेकर, भूपेंद्र यादव, अनिल जैन, अनिल बलुनी या मंडळींनीच शहा यांचा विश्वास ताज्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड यशात बदलून दाखवला.।कैलाश विजयवर्गीयभाजपचा प. बंगालमध्ये विस्तार करण्यासाठी शहा यांनी सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना निवडले. त्यांच्यासोबत सहप्रभारी अरविंद मेनन हे होते.>अरुण सिंहगेल्या वर्षी पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांना ओडिशाचे प्रभारी बनवले गेले होते. त्यांनी स्थानिक मुद्दे घेऊन रणनीती बनवली. शिवाय बी.जे. पांडा यांच्यासारखा नेता पक्षात आणला.>प्रकाश जावडेकरजावडेकर यांनी राज्यातील विस्कळीत पक्ष नीट केला. जाट, गुजर समाजाची मते मिळण्यासाठी जावडेकर यांनी वसुंधरा राजे यांचे मन वळवले.>अनिल जैनअनिल जैन यांच्याकडे हरियाणा व छत्तीसगडचा प्रभार दिला गेला होता. छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांची तिकिटे कापली. तरीही जैन यांनी पक्षात असंतोष निर्माण होऊ दिला नाही.>भूपेंद्र यादवगुजरात, राजस्थान विधानसभा निवडणुकीत यादव यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांचे काम आणि कौशल्ये पाहून त्यांच्याकडे मोदी, शहा यांच्या प्रचार सभांच्या आयोजनाचे काम होते.>अनिल बलुनीभाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलुनी यांनी मोदी, शहा आणि पक्षाच्या बातम्या प्रसारमाध्यमांत ठळकपणे कशा दिसतील यावर सातत्याने काम केले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९