जालना रोडवरील भुयारी मार्ग कागदावरच

By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30

प्रस्तावावर चर्चाच नाही: आराखडा रस्ते विकास महामंडळाकडेच

On the subway lines of Jalna Road on paper | जालना रोडवरील भुयारी मार्ग कागदावरच

जालना रोडवरील भुयारी मार्ग कागदावरच

रस्तावावर चर्चाच नाही: आराखडा रस्ते विकास महामंडळाकडेच
औरंगाबाद : जालना रोडवरील अमरप्रीत चौक आणि महावीर चौक येथे २४ कोटी रुपयांतून भुयारी मार्ग करण्याच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीला राज्य शासनाने तत्त्वत: दिलेली मान्यता कागदावरच राहिली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेला आराखडादेखील अजून विचारात घेतलेला नाही. मोंढानाका हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. महावीर चौक आणि वसंतराव नाईक चौक येथील उड्डाणपुलांंचे काम मे अखेरपर्यंत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
महावीर चौक आणि अमरप्रीत चौकात भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात शासनाने तत्त्वत: मान्य केला होता. गेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे या कामांसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार होता. दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी निधी मिळाला नाही. परिणामी दोन्ही भुयारी मार्गांचे काम कागदावरच राहिले आहे. मोंढा नाका पूल झाल्यामुळे अमरप्रीत चौक, दूध डेअरी चौकात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी खोळंबा होतो आहे. सातारा-देवळाईकडून येणारी वाहतूक त्या चौकातूनच महावीर चौक व वसंतराव नाईक चौकासह शहरात वळते. त्यामुळे तेथे संग्रामनगर ते अजबनगर असा भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता. आता या प्रस्तावावर सत्ताधारी आणि प्रशासनातून कुणीही बोलत नाही.

उड्डाणपुलांचे काम संथगतीने
सिडको आणि महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरूआहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने मे अखेरीस त्या दोन्ही पुलांचे काम पूर्ण होईल, असा दावा केला आहे. महावीर चौकातील पुलाला ३१ कोटी ३२ लाख रुपये खर्च आहे. ६५५ मीटर पुलाची एकूण लांबी आहे, तर १६ मीटर रुंदी आहे. ५.५ मीटर पुलाची उंची आहे. १८ महिन्यांत पुलाचे काम करणे बंधनकारक होते; परंतु २८ महिन्यांपासून त्या पुलाचे काम सुरू आहे. ३१ जानेवारी २०१४ रोजी त्या पुलाचे काम सुरू झाले आहे. ३१ जुलै २०१५ ही पुलाचे काम संपण्याची डेडलाईन होती. वसंतराव नाईक चौक, सिडको येथील पुलाची डेडलाईन १३ फे बु्रवारी २०१६ रोजीच संपली आहे. ५६ कोटी २५ लाख रुपयांतून त्या पुलाचे काम सुरू आहे. १००१ मीटर पुलाची लांबी आहे. १४ मीटर रुंदी आहे. ५.५ मीटर इतकी पुलाची उंची आहे. २४ महिने पुलाच्या कामाची मुदत होती.

Web Title: On the subway lines of Jalna Road on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.