सुब्रतो राय यांची घरात नजरकैद ठेवण्याची विनंती फेटाळली

By Admin | Updated: May 20, 2014 18:52 IST2014-05-20T18:49:06+5:302014-05-20T18:52:23+5:30

नवी दिल्ली : सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो राय यांचा तिहार मुक्काम पुन्हा वाढला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राय यांना त्यांच्या लखनौस्थित निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याची विनंती फेटाळून लावत, त्यांना जामीन देण्यास नकार दिला़ गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार, याचा तर्कसंगत व स्वीकार्य प्रस्ताव सादर करण्याचेही न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले़

Subroto Roy's request was kept in his house | सुब्रतो राय यांची घरात नजरकैद ठेवण्याची विनंती फेटाळली

सुब्रतो राय यांची घरात नजरकैद ठेवण्याची विनंती फेटाळली

नवी दिल्ली : सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो राय यांचा तिहार मुक्काम पुन्हा वाढला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राय यांना त्यांच्या लखनौस्थित निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याची विनंती फेटाळून लावत, त्यांना जामीन देण्यास नकार दिला़ गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार, याचा तर्कसंगत व स्वीकार्य प्रस्ताव सादर करण्याचेही न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले़
न्या़ तीरथसिंह ठाकूर आणि न्या़ ए़के.सिकरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला नवा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले़ न्या़ जे़एस़ खेहड हे या खटल्याच्या सुनावणीतून बाजुला झाल्याने सरन्यायाधीशांनी नव्या खंडपीठाची नियुक्ती केली आहे़
लंडन व न्यूयॉर्कस्थित हॉटेलसह आपली संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास सहारा समूह प्रयत्नशील असल्याचे सहाराने यावेळी न्यायालयास सांगितले़ यावर पुढील सुनावणीत तर्कसंगत व ठोस प्रस्ताव सादर करण्यास न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले़ वारंवार आदेश देऊनही गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल ६५ वर्षीय राय गत ४ मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Subroto Roy's request was kept in his house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.