शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"किती ऑक्सिजन आहे, हे सांगू नका; किती सप्लाय झाला ते सांगा", भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 19:57 IST

देशात गेल्या चोवीस तासांत 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे 3417 जणांचा मृत्यू झाला. तसेच 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. देशातील रुग्णालयांत कोरोना रुग्णांनी बेड भरले आहेत. तसेच कोरोनाच्या लढाईत साधनेही कमी पडत आहेत. परिस्थिती अशी आहे, की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयांत व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. (Subramanian Swamy says Gov should stop saying how much o2 is available but tell us how much has been supplied and to which hospital )

ऑक्सीजनच्या कमतरतेवर सुब्रमण्यम स्वामींनी केंद्राला घेरलं -कोरोनाची भयावह स्थिती आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा, यातच भाजचे राज्यसभा खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच सरकारला घेरले आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी ट्विट केले आहे. ते म्हणाले, “आपल्या जवळ किती ऑक्सिजन उपलब्ध आहे, हे सांगणे सरकारने बंद करावे. त्याऐवजी, आपण किती सप्लाय केला आहे आणि तो कोण-कोणत्या रुग्णालयांना केला आहे, हे सरकारने सांगायला हवे.”

स्वामी पुढे म्हणाले, "गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच स्टँडिंग कमिटी फॉर हेल्थने ऑक्सिजन सिलेंडर आणि सप्लायची कमी असल्याचे म्हटले होते. मात्र, सरकारने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही."

CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?

ऑक्सिजन अभावी कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू - कर्नाटकातील चामराजनगर येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तब्बल 24 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे 250 ऑक्सिजन सिलेंडर पाठविण्यात आले आहेत. चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता. मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. सांगण्यात येते, की मृत्यू झालेल्यांतील अधिकांश रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन सप्लाय थांबल्यानंतर ते तडफडू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.

आज देशात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले- देशात गेल्या चोवीस तासांत 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे 3417 जणांचा मृत्यू झाला. तसेच 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. 

CoronaVirus : ऑक्सिजन पोहोचायला झाला उशीर, कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 झाली असून, त्यातील 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत 2 लाख 18 हजार 959 जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 34 लाख 13 हजार 642 इतकी आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीOxygen Cylinderऑक्सिजन