CoronaVirus : ऑक्सिजन पोहोचायला झाला उशीर, कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:18 PM2021-05-03T13:18:17+5:302021-05-03T13:18:40+5:30

चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता. मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली.

CoronaVirus Karnataka chamrajangar hospital oxygen shortage corona patients died | CoronaVirus : ऑक्सिजन पोहोचायला झाला उशीर, कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू

CoronaVirus : ऑक्सिजन पोहोचायला झाला उशीर, कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू

Next

म्हैसूर - कोरोनाने संपूर्ण देशातच हाहाकार माजवला आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा जीव जात आहे. आता कर्नाटकातील चामराजनगर येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तब्बल 24 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे 250 ऑक्सिजन सिलेंडर पाठविण्यात आले आहेत. (Karnataka chamrajangar hospital oxygen shortage Corona patients died)

चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता. मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. सांगण्यात येते, की मृत्यू झालेल्यांतील अधिकांश रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन सप्लाय थांबल्यानंतर ते तडफडू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! गेल्या २४ तासांत ३,४१७ जणांचा मृत्यू

यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी म्हटले आहे, की चामराजनगर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मी म्हैसूर, मंड्या आणि चामराजनगर येथे जात आहे. तेथे जाऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेईल आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. 

यापूर्वी कालाबुर्गी येथील केबीएन रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच यदगीर सरकारी रुग्णालयात लाइट गेल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णाचाही मृत्यू झाला होता. याशिवाय कर्नाटकातील अनेक रुग्णालयांत गेल्या एक आठवड्यात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन आभावी मृत्यू झाला आहे. 

आतापर्यंत कर्नाटकात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 16 लाखच्याही पुढे गेला आहे. येथे रविवारी 37 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तसेच 217 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे देशाची स्थिती - 
देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३४१७ जणांचा मृत्यू झाला. तसेच ३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात दिवसेंदिवस अधिक कोरोना रुग्ण वाढत आहेत. 

Corona Vaccine : लस घेतल्या घेतल्या सगळ्यात आधी 'या' ६ गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा लस घेऊनही कोरोना संक्रमित व्हाल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ झाली असून, त्यातील १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख १८ हजार ९५९ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख १३ हजार ६४२ इतकी आहे. 

Read in English

Web Title: CoronaVirus Karnataka chamrajangar hospital oxygen shortage corona patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.