काँग्रेस कार्यकर्त्यांचा सुब्रहमण्यम स्वामींच्या ताफ्यावर हल्ला
By Admin | Updated: February 27, 2016 16:53 IST2016-02-27T16:53:33+5:302016-02-27T16:53:33+5:30
काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी यांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. सुब्रहमण्यम स्वामींच्या गाडीवर अंडी, टोमॅटो तसंच शाई फेकण्यात आली

काँग्रेस कार्यकर्त्यांचा सुब्रहमण्यम स्वामींच्या ताफ्यावर हल्ला
ऑनलाइन लोकमत -
कानपूर, दि. 27- काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी यांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. सुब्रहमण्यम स्वामींच्या गाडीवर अंडी, टोमॅटो तसंच शाई फेकण्यात आली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पळवण्यासाठी बळाचा वापर केला ज्यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष सुरेंद्र मैथानी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुब्रहमण्यम स्वामींचा ताफा सकाळी 11 वाजता एस डी कॉलेजला चालला असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. सुब्रहमण्यम स्वामी एस डी कॉलेजला जागतिक दहशतवादावरील सेमिनारसाठी चालले होते. पोलिसांना सुब्रहमण्यम स्वामींच्या दौ-याची माहिती दिला असतानादेखील सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच व्यवस्था केली गेली नसल्याचा आरोप सुरेंद्र मैथानी यांनी केला आहे.
#WATCH Subramanian Swamy's car pelted with eggs & tomatoes in Kanpur, protesters also threw ink & waved black flagshttps://t.co/jjqc1drXlW
— ANI (@ANI_news) February 27, 2016