सुभाष साठे यांनी आयकर प्रकरणी दस्तऐवज मागितले प्रकरण न्यायालयात : विदेशी खात्यासंबंधी तपशील द्यावा लागणार

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:49+5:302015-07-10T21:26:49+5:30

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे पुत्र सुभाष आणि सून इंद्राणी साठे यांनी आयकर खात्याने पाठविलेल्या नोटिशीसंबंधी दस्तऐवजाची मागणी दिल्ली न्यायालयाकडे केली आहे. साठे दाम्पत्याने स्वीस बँकेतील संयुक्त खात्याबद्दल माहिती दडवून ठेवल्यामुळे आयकर विभागाने काळ्या पैशाचे प्रकरण दाखल करीत नोटीस बजावली होती.

Subhash Sathe sought documents for income tax case in the court of the case | सुभाष साठे यांनी आयकर प्रकरणी दस्तऐवज मागितले प्रकरण न्यायालयात : विदेशी खात्यासंबंधी तपशील द्यावा लागणार

सुभाष साठे यांनी आयकर प्रकरणी दस्तऐवज मागितले प्रकरण न्यायालयात : विदेशी खात्यासंबंधी तपशील द्यावा लागणार

ी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे पुत्र सुभाष आणि सून इंद्राणी साठे यांनी आयकर खात्याने पाठविलेल्या नोटिशीसंबंधी दस्तऐवजाची मागणी दिल्ली न्यायालयाकडे केली आहे. साठे दाम्पत्याने स्वीस बँकेतील संयुक्त खात्याबद्दल माहिती दडवून ठेवल्यामुळे आयकर विभागाने काळ्या पैशाचे प्रकरण दाखल करीत नोटीस बजावली होती.
या दोघांना पुरेसे कायदेशीर दस्तऐवज पुरविण्यात यावे, असा आदेश अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी प्रीतम सिंग यांनी शुक्रवारी दिला. अलीकडेच समन्सनुसार साठे दाम्पत्याने न्यायालयात हजेरी लावल्यानंतर न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यांना १७ ऑगस्ट रोजी नोटिशीला उत्तर आणि युक्तिवाद करायचा असल्यामुळे कायदेशीर दस्तऐवजांची गरज होती. जिनेव्हातील एचएसबीसी बँकेत संयुक्त खात्यात या दोघांनी ७ लाख अमेरिकन डॉलर्स(सुमारे ४.४४ कोटी रुपये) ठेवल्याची बाब उघड झाल्यानंतर आयकर विभागाने केलेल्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने समन्स बजावला होता.
तपास शाखेने जाबजबाब घेतला असता या दाम्पत्याने आरोप मान्य करीत कराची थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. आयकर खात्याच्या २७६ डी नुसार बँक खाते आणि दस्तऐवज न पुरविल्याबद्दल त्यांना आरोपी ठरविण्यात आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर छापे घालण्यात आल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)
-------------------------------
एचएसबीसी बँकेत खाते
आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर २००६ पर्यंत त्यांच्या खात्यात ७,४९,३७० अमेरिकन डॉलर्स जमा दाखविण्यात आले आहे. साठे दाम्पत्य सन व्हॅक्यूम फॉर्मर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टीआरडब्ल्यू सन स्टीअरिंग व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांचे संचालक आहेत. गुडगाव, मानेसर अिाण पुण्यात त्यांचे वाहनाचे सुटे भाग आणि प्लास्टिक घटकांचे कारखाने आहेत.

Web Title: Subhash Sathe sought documents for income tax case in the court of the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.