इंगळगी सोसायटीवर शिवदारे गटाची सत्ता निवडणूक बिनविरोध: सुभाष देशमुख गटाला ३ जागा

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:39+5:302015-07-10T23:13:39+5:30

सोलापूर : इंगळगी विविध कार्यकारी सोसायटीची सत्ता आपल्याच हाती ठेवण्यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यशस्वी ठरले़ आ़ सुभाष देशमुख गटाला तीन जागा सोडण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध झाली़

Subhash Deshmukh: Three seats for Shiv Sena group | इंगळगी सोसायटीवर शिवदारे गटाची सत्ता निवडणूक बिनविरोध: सुभाष देशमुख गटाला ३ जागा

इंगळगी सोसायटीवर शिवदारे गटाची सत्ता निवडणूक बिनविरोध: सुभाष देशमुख गटाला ३ जागा

लापूर : इंगळगी विविध कार्यकारी सोसायटीची सत्ता आपल्याच हाती ठेवण्यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यशस्वी ठरले़ आ़ सुभाष देशमुख गटाला तीन जागा सोडण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध झाली़
सहकारमहर्षी वि़ गु़ शिवदारे यांच्यानंतर राजशेखर शिवदारे यांच्याकडे सहकाराचा वारसा आला़ इंगळगी सोसायटीवर त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले़ यावेळी भाजपाचे आ़ सुभाष देशमुख गटाच्या १० उमेदवारांनी त्यांना आव्हान दिले़ मात्र त्यांना तीन जागा देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली़ या सोसायटीत शिवदारे-देशमुख गट एकत्रपणे काम करणार असल्याचे स्पष्ट झाले़
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे: राजशेखर शिवदारे, राहुल देशमुख, मलकप्पा घोडके, संभाजी माने, रमेश वळसंगे, सुरेश गुरव, सोमण्णा फताटे, युसूफ बागवान, श्यामिका वळसंगे, लक्ष्मीबाई कोरे, राजशेखर बंडगर, अकबर शेख, सिद्धाराम सण्णके़
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी इनोंदगी कोरे, शिवसिद्ध कोरे, म्हाळप्पा गाडेकर, बाबुलाल शेरीकर, रामप्पा चिवडशे˜ी, धोंडप्पा पटणे आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)

Web Title: Subhash Deshmukh: Three seats for Shiv Sena group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.