भीमा-सीना नदीवर बॅरेजेस बांधण्याची मागणी सुभाष देशमुख: मुख्यमंत्र्यांनी दिले सर्वेक्षणाचे आदेश
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणार्या सीना आणि भीमा नद्यांवर बॅरेजेस बांधण्याची मागणी आ़ सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली़ मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा सचिवांना दिल़े

भीमा-सीना नदीवर बॅरेजेस बांधण्याची मागणी सुभाष देशमुख: मुख्यमंत्र्यांनी दिले सर्वेक्षणाचे आदेश
स लापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणार्या सीना आणि भीमा नद्यांवर बॅरेजेस बांधण्याची मागणी आ़ सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली़ मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा सचिवांना दिल़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौर्यावर आले असता आ़ सुभाष देशमुख यांनी कर्देहळ्ळी येथील पाहणी दौर्यात ही मागणी केली़ दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणार्या भीमा आणि सीना नद्यांवर बॅरेजेस बांधल्यास मोठा पाणीसाठा होऊ शकतो़ याशिवाय बॅरेजेस बांधताना भूसंपादनाची गरज भासणार नाही़ कमी रकमेत मोठय़ा प्रमाणात पाणी अडवले जात असल्याने बॅरेजेस उपयुक्त ठरत आहेत़ याकडे लक्ष वेधत आ़ सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना भीमा-सीना नद्यांवर बॅरेजेस बांधण्याची मागणी केली़ त्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज असून 50 लाखांची तरतूद करावी असे म्हटले आह़े मुख्यमंत्र्यांनी आ़ सुभाष देशमुख यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून राज्याचे जलसंपदा सचिव यांना भीमा-सीना नद्यांवर बॅरेजेस बांधण्यासाठी सुयोग्य ठिकाणे, अंदाजित रक्कम याबाबतचे सर्वेक्षण करण्याचे तातडीने आदेश दिल़े (प्रतिनिधी)