पाणी चोरीप्रकरणी उपअभियंता राठोड यास जामीन
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30
सोलापूर : महापालिकेच्या उजनी जलवाहिनीवरील पाणी चोरीप्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता विजयकुमार राठोड (वय 47, रा. प्रतापनगर, सोलापूर) यास पोलीस तपासकामी मदत करण्याच्या अटीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कंकणवाडी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

पाणी चोरीप्रकरणी उपअभियंता राठोड यास जामीन
स लापूर : महापालिकेच्या उजनी जलवाहिनीवरील पाणी चोरीप्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता विजयकुमार राठोड (वय 47, रा. प्रतापनगर, सोलापूर) यास पोलीस तपासकामी मदत करण्याच्या अटीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कंकणवाडी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. उजनी जलवाहिनीवरून पाणी चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावर आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी शोध मोहीम राबविली. यात महापालिकेत काम करणारा मजूर किसन कापसे व चालक ज्योतीबा काकडे या दोघांनी संगनमत करून शेतकर्यांना कनेक्शन दिल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्या दोघा कर्मचार्यांसह 26 शेतकर्यांवर टेंभुर्णी व मोहोळ पोलीस ठाण्यात पाणीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. अटक केलेल्या काकडे व कापसे यांच्या जबाबात पाणी चोरीप्रकरणात उपअभियंता राठोड यांचे सहकार्य असल्याची माहिती दिल्यावर त्यांचेही नाव गुन्हय़ात समाविष्ट करण्यात आले. या प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी उपअभियंता राठोड यांनी अँड. शशी कुलकर्णी, अँड. प्रशांत नवगिरे, अँड. गुरुदत्त बोरगावकर, अँड. देवदत्त बोरगावकर, अँड. स्वप्नील सरवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. पाणी चोरीप्रकरण उघडकीस आणण्यास राठोड यांनीच मदत केली आहे. केवळ राजकीय दबावापोटी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते सरकारी अधिकारी असल्याने कोठेही पळून जाणार नाहीत असा युक्तिवाद केला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी काम पाहिले.