शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आठवी नापास पत्नीला बनवलं सब इन्स्पेक्टर, राजस्थान पेपर लीक प्रकरणातील मास्टमाईंडचा कारनामा, असा रचला प्लॅन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:54 IST

Rajasthan Paper Leak Case:

राजस्थान पेपर लीक प्रकरणामध्ये दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणातील मास्टरमाईंड हर्षवर्धन याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासामध्ये आरोपी हा अनेक वर्षांपासून परीक्षांमध्ये हेराफेरी करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राजस्थान लोकसेवा आयोगाने २०२१ मध्ये सब इन्स्पेक्टर आणि प्लाटून कमांडर भरती परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेमध्ये आरोपी हर्षवर्धन याने पेपर लीक आणि डमी उमेदवारांच्या माध्यमातून ५० हून अधिक उमेदवारांना उत्तीर्ण केले होते. 

दरम्यान, पोलीस तपासामध्ये हर्षवर्धन याने अनेक उमेदवारांनाच नाही तर  त्याच्या आठवी नापास पत्नीलाही पोलीस भरती परीक्षेत उत्तीर्ण केले होते. हर्षवर्धनने आधी पत्नीसाठी चुकीच्या पद्धतीने बीएची पदवी मिळवली. त्यानंतर डमी उमेदवाराच्या माध्यमातून तिला सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण केले होते. त्याशिवाय पेपर लीक प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत १६ आणखी आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सहा महिला सब इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टर कृपाल सिंह यांचा समावेश आहे. कृपाल सिंह हा नागौरच्या डेप्युटी एसपींचा मुलगा आहे. सब इन्स्पेक्टरचं प्रशिक्षण घेत असलेले ३५ आरोपी आणि या परीक्षेमध्ये अव्वल आलेला आरोपी नरेश विश्नोई हाही पोलिसांच्या अटकेत आहे.

पकडण्यात आलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्याशिवाय अनेक आरोपी ट्रेनिंग सेंटरमधून फरार झाले आहेत. राजस्थान पेपर लीक प्रकरणामध्ये एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, भरती परीक्षेमध्ये पहिल्या आलेल्या एका व्यक्तीसह १५ प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षकांना फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि डमी उमेदवारांची मदत घेऊन (२०२१) परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी हर्षवर्धन हा आश्रमही चालवतो, तसेच तिथे तो लोकांना प्रवचन देत असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र आता त्याचा खरा चेहरा समोर आला आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिसexamपरीक्षा