चेंगराचेंगरीनंतर स्नान घाटावर कडेकोट सुरक्षा

By Admin | Updated: July 16, 2015 03:54 IST2015-07-16T03:54:49+5:302015-07-16T03:54:49+5:30

आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथे पुष्करम उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर येथील घाटावरील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Sturdy security on the bathing ghat after the stampede | चेंगराचेंगरीनंतर स्नान घाटावर कडेकोट सुरक्षा

चेंगराचेंगरीनंतर स्नान घाटावर कडेकोट सुरक्षा

राजमुंद्री : आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथे पुष्करम उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर येथील घाटावरील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घाटावर स्नानासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन २७ जण मृत्युमुखी पडले होते. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी भाविकांना वेगवेगळ्या घाटांकडे स्नानासाठी पाठविले. दरम्यान, राज्य सरकारने चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी अमावास्येनिमित्त भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे आणि भाविकांना एकाच घाटावर न जाता वेगवेगळ्या घाटांवर जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

Web Title: Sturdy security on the bathing ghat after the stampede