सिनेस्टाईल पाठलाग करुन वाळूचे डंपर पकडले तालुका पोलिसांची कारवाई : गिरणा नदी पात्रातून वाळूची चोरी
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:59+5:302015-09-11T21:24:59+5:30
सोबत फोटो-

सिनेस्टाईल पाठलाग करुन वाळूचे डंपर पकडले तालुका पोलिसांची कारवाई : गिरणा नदी पात्रातून वाळूची चोरी
स बत फोटो-जळगाव: गिरणा नदी पात्रातून वाळूची चोरी करणार्या अनिल अर्जुन कोळी रा.वराडसीम व प्रमोद आनंदा सोनवणे रा.खेडी खुर्द या दोघांना तालुका पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून वाळूने भरलेल्या डंपरसह ताब्यात घेतले.भरधाव वेगाने धावणार्या डंपरसमोर पोलीस गाडी आडवी लावल्याने कर्मचारी अपघातापासून थोडक्यात बचावले. ठेका बंद असलेल्या गिरणा नदीपात्रातून कानळदामार्गे वाळूची मध्यरात्री चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांना मिळाली होती. त्यावरुन पाटील यांनी सहकारी राजेंद्र बोरसे, अशोक पाटील, रवींद्र पवार, मनोज जोशी, जितेंद्र पाटील, गिरीश पाटील, प्रफुल्ल धांडे व सहायक फौजदार तडवी यांना सोबत घेऊन कानळदा रस्त्यावर अत्तरदे पेट्रोल पंपावर सापळा रचला. दोन वाजेच्या सुमारास दोन डंपर एकामागून एक आल्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकांनी न थांबता अजून भरधाव वेगाने डंपर पळविले. यावेळी पाटील यांनी दोन्ही डंपरच्या मागे आपले वाहन लावले. पुढे गेल्यावर सरळ डंपरसमोर पोलीस गाडी आडवी लावण्यात आली. चालकाने वेळेत सावरल्याने डंपर पोलीस गाडीच्या अगदी जवळ थांबले.इन्फो-खेडी येथून वाळू चोरल्याची कबुलीडंपर चालक अनिल अर्जुन कोळी याने त्याच्या ताब्यातील डंपर (एम.एच.१९ बी.एम.७०७०) हे भूषण सपकाळे याचे तर प्रमोद आनंदा सोनवणे याच्या ताब्यातील डंपर (एम.एच.१९ झेड ९९९१) हे विक्की सोनवणे याचे असल्याचे सांगितले. खेडी नदीपात्रातून ही वाळू चोरल्याची कबुली दोघांनी दिली. १२ हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळू व २९ लाखांचे दोन डंपर ताब्यात घेऊन चालकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.