मुख्यमंत्र्यांकडूनच सुरू आहे स्टंटबाजी
By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30
विद्या बाळ : बलराज साहनी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण

मुख्यमंत्र्यांकडूनच सुरू आहे स्टंटबाजी
व द्या बाळ : बलराज साहनी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरणपुणे : सध्या मंदिरप्रवेशावरुन चालू असलेल्या वादावर अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत. यामध्ये तृप्ती देसाई, गुप्ते यांसारख्या महिला स्टंटबाजी करत असल्याचे बोलले जात असताना कोणतीही ठोस भूमिका न घेतलेले मुख्यमंत्री खरी स्टंटबाजी करत आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केला. बलराज सहानी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अभिनेता ओंकार गोवर्धन याला बलराज सहानी पुरस्काराने तर लेखक संजय पवार यांना कैफी आझमी पुरस्काराने बाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर फाऊंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर, दिग्दर्शक धम्मर्कीर्ती सुमंत, अलका देशपांडे व अनिकेत बाळ उपस्थित होते. बाळ म्हणाल्या, 'महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत शासन आणि मुख्यमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत ही खेदाची बाब आहे. तर या अधिकारासाठी लढणार्या महिलांना अशाप्रकारे मार खावा लागतो ही वाईट गोष्ट आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाचा कायदा ५६ सालीच झालेला असून त्यासाठी भांडण्याची आवश्यकता नसून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.' बाईच्या पाळीचा शास्त्रीय आधार अपवित्र मानला जात असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही. सध्या प्रत्येकाच्या तोंडाला कुलूपे लावली जात असून दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि कन्हैया ही त्याची उदाहरणे आहेत. फुले, शाहू आणि आंबेडकरांची नावे घेऊन मोठमोठ्या बाता केल्या जातात, मात्र कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अवलंब होताना दिसत नाही. नक्की राष्ट्रद्रोही कोण ?रविवारी कन्हैया कुमारचे पुण्यात भाषण होते. त्याविषयी बोलताना बाळ म्हणाल्या, कन्हैयावरील राष्ट्रद्रोहाचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. तरीही त्याला काही जणांकडून राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. त्यामुळे तो राष्ट्रद्रोही आहे की त्याला राष्ट्रद्रोही ठरविणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत याचा विचार व्हायला हवा.