चिमणीच्या उजेडात अभ्यास करून मनीषा चमकली
By Admin | Updated: June 12, 2015 17:37 IST2015-06-12T17:37:58+5:302015-06-12T17:37:58+5:30
धर्माबाद : पत्राच्या दहा बाय दहाच्या झोपडीत राहून, सुटीच्या दिवशी आईसोबत मोलमजुरी करून आर्थिक परिस्थितीवर मात करीत चिमणीच्या उजेडात जिद्दीने अभ्यास करून मनीषा कदम या मुलीने दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण घेवून घवघवीत यश मिळविले़

चिमणीच्या उजेडात अभ्यास करून मनीषा चमकली
ध ्माबाद : पत्राच्या दहा बाय दहाच्या झोपडीत राहून, सुटीच्या दिवशी आईसोबत मोलमजुरी करून आर्थिक परिस्थितीवर मात करीत चिमणीच्या उजेडात जिद्दीने अभ्यास करून मनीषा कदम या मुलीने दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण घेवून घवघवीत यश मिळविले़ चिकना ता़धर्माबाद येथील रामराव कदम यांची मनीषा ही मुलगी़ घरची आर्थिक परिस्थिती बेताची़ खायचीही भ्रांत नाही़ मुलांचे शिक्षण कसे करायचे, असा प्रश्न तिच्या आईला पडायचा़ मनीषा हुशार असूनही गरीबी आडवी येत होती़ ते धर्माबादला रसिकनगर येथे पत्राच्या झोपडीत राहू लागले़ वडील असूनही नसल्यासारखे होते़ ते लक्ष देत नसल्याने आई घर सांभाळायची़ आईनेच मोठ्या बहिणीचे बाळांतपण दहा बाय दहा आकाराच्या खोलीत केले़ चटणी भाकर खावून बहिण-भावंड राहत होते़ परिस्थितीची जाणीव असल्याने कोणत्याही गोष्टीचा ह मनीषाने केला नाही़ आहे त्या परिस्थितीला ती सामोरे गेली़शाळेच्या सुटीच्या दिवशी मनीषा आईसोबत कामाला जायची़ लहान भाऊ देखील सोबत असायचा़ कामावरून घरी आल्यानंतर ती अभ्यास करायची़ घरात विद्युत मीटर नाही़ त्यामुळे तिला रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात अभ्यास करावा लागत होता़ कधी रॉकेल नसेल तेव्हा विद्युत पोलच्या दिव्याखाली ती अभ्यास करायची़ जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे गुण अंगी असले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे मनीषाने ९१ टक्के गुण दहावीत मिळवून दाखवून दिले़ या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनी मनीषा व तिच्या आईचा सत्कार केला़ यावेळी ज्येष्ठ पत्रकार जी़पी़मिसाळे, सुभाष कांबळे, धोंडिबा गायकवाड, हुल्लाजी धडेकर, संदीप बनसोडे, रवि देयके, सहानाम बनसोडे, विमलबाई बनसोडे, सुषमा गायकवाड, शीला वाघमारे, सदानंद देवके, विनोद मिसाळे उपस्थित होते़