शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

देशात राहून परदेशी शिक्षण; तिकडची विद्यापीठेच येणार भारतात! प्रवेश प्रक्रिया, शुल्क संरचना ठरवण्याचे स्वातंत्र्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 06:18 IST

परदेशी विद्यापीठे ही भारत सरकारच्या अनुदानित संस्था नसल्यामुळे त्यांची प्रवेश प्रक्रिया, शुल्क संरचना ठरवण्यात यूजीसीची कोणतीही भूमिका नाही, असे कुमार यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : अखेर भारतात परदेशी विद्यापीठ सुरू करण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. ‘परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्यासाठी यूजीसीची परवानगी घ्यावी लागेल, सुरुवातीला त्यांना १० वर्षांसाठी मान्यता दिली जाईल. ते प्रवेश प्रक्रिया, शुल्क संरचना ठरवण्यास स्वतंत्र असतील,’ अशी महत्त्वाची घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी गुरुवारी केली.कुमार यांनी यूजीसी नियमन २०२३ वर पत्रकारांशी चर्चा करताना ही घोषणा केली. ते म्हणाले, भारतात कॅम्पस उभारणाऱ्या परदेशी विद्यापीठांना त्यांची स्वतःची प्रवेश प्रक्रिया आखण्याचे स्वातंत्र्य असेल. या संस्था शुल्क रचनाही ठरवू शकतात. काही युरोपीय देशांतील विद्यापीठांनी भारतात कॅम्पस सुरू करण्यास स्वारस्य दाखविले आहे. 

शिक्षणाचा दर्जा राखावा लागणारपरदेशी विद्यापीठे ही भारत सरकारच्या अनुदानित संस्था नसल्यामुळे त्यांची प्रवेश प्रक्रिया, शुल्क संरचना ठरवण्यात यूजीसीची कोणतीही भूमिका नाही, असे कुमार यांनी स्पष्ट केले. 

काय होणार, काय होणार नाही...- परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये आरक्षण धोरण लागू करण्याबाबत परदेशी विद्यापीठे निर्णय घेतील आणि त्यात यूजीसीची कोणतीही भूमिका असणार नाही.- मूल्यमापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या गरजांचे मूल्यांकन केल्यानंतर, परदेशातील विद्यापीठांप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था असू शकते.- परदेशी विद्यापीठांनी भारतात कॅम्पस स्थापन केल्यानंतर त्यांना केवळ कॅम्पसमध्येच प्रत्यक्ष वर्गांसाठी पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकवण्याची परवानगी आहे. ऑनलाइन माध्यम किंवा दूरस्थ शिक्षण मोडची त्यांना परवानगी नाही.- परदेशी विद्यापीठे भारतातील शैक्षणिक संस्थांशी करार करून कॅम्पस स्थापन करू शकतात. परदेशातून निधी हस्तांतरित करणे हे परकीय चलन कायद्यांतर्गत असेल.

परदेशी विद्यापीठांना त्यांच्या भारतीय कॅम्पसमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा त्यांच्या मुख्य कॅम्पसमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या बरोबरीने आहे याची खात्री करावी लागेल.        - एम. जगदेश कुमार, अध्यक्ष, यूजीसी  

परदेशी विद्यापीठांना त्यांच्या भारतीय कॅम्पसमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा त्यांच्या मुख्य कॅम्पसमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या बरोबरीने आहे याची खात्री करावी लागेल.        - एम. जगदेश कुमार, अध्यक्ष, यूजीसी  

टॅग्स :Educationशिक्षण