विद्यार्थ्यांनी केले 30 हजार बियांचे संकलन आर्या पब्लिक स्कूलचा उपक्रम : ज्ञानार्जनाबरोबर सामाजिक बांधीलकी
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:11+5:302016-03-03T01:57:11+5:30
पिंपळनेर :

विद्यार्थ्यांनी केले 30 हजार बियांचे संकलन आर्या पब्लिक स्कूलचा उपक्रम : ज्ञानार्जनाबरोबर सामाजिक बांधीलकी
प ंपळनेर : गंगामाईनगर-पिंपळनेर (ता़ माढा) येथील 510 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या 30 हजार बियांचे संकलन केले आह़े शेतकरी सन्मान परिषदेने सुरू केलेल्या मुलस्थानी बीजारोपण या मोहिमेंतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने एस़ एस़ पी़ सिड्स बँक उभारून जून 2016 पर्यंत 1 कोटी बिया जमा करण्याचा संकल्प सामाजिक जाणिवेतून घेतला आह़े या प्रकल्पांतर्गत जमा झालेल्या बिया दुष्काळग्रस्त शेतकर्यांना वाटप केल्या जाणार आहेत़ पं़ स़ चे माजी सभापती रणजित शिंदे, संस्थेच्या अध्यक्षा शिंदे, प्रकल्प संचालक परवीन जमादार यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आह़े राज्यातील 100 शाळांमध्ये बिया संकलनाचा उपक्रम राबविला जात आह़े आंबा, चिंच, चिक्कू, सफरचंद, पपई यासह अन्य 15 प्रकारच्या बिया जमा केल्या जात आहेत़ विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच सामाजिक जाणीव प्रगल्भ होऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश रुजावा या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केल्याचे प्राचार्य अन्वर मुलाणी, विभागप्रमुख निलोफर शेख यांनी सांगितल़ेया बियांचे जुलैमध्ये वाटप केले जाणार असल्याचे शेतकरी सन्मान परिषदेचे अध्यक्ष सत्तार शेख व पदाधिकारी शहानवाज शेख यांनी सांगितल़े (वार्ताहर)