विद्यार्थ्याच्या अपहरणाचा पुन्हा प्रयत्न आनंदीबाई विद्यालयातील प्रकार : संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात
By Admin | Updated: March 10, 2016 00:26 IST2016-03-10T00:26:14+5:302016-03-10T00:26:14+5:30
जळगाव: गेल्या आठवड्यात विद्यार्थी अपहरण प्रकरणाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारीही आनंदीबाई देशमुख बालक विद्या मंदिर या विद्यालयातून पाचवीच्या वर्गातील अबुजर निसार खाटीक (वय १०, रा.शिवाजी नगर) या विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला.अन्य विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेने हा प्रयत्न असफल झाला आहे. दरम्यान, राजेंद्र लोटन चौधरी (वय ४७ रा.मांजरोद, ता.शिरपुर जि.धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा पुन्हा प्रयत्न आनंदीबाई विद्यालयातील प्रकार : संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात
ज गाव: गेल्या आठवड्यात विद्यार्थी अपहरण प्रकरणाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारीही आनंदीबाई देशमुख बालक विद्या मंदिर या विद्यालयातून पाचवीच्या वर्गातील अबुजर निसार खाटीक (वय १०, रा.शिवाजी नगर) या विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला.अन्य विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेने हा प्रयत्न असफल झाला आहे. दरम्यान, राजेंद्र लोटन चौधरी (वय ४७ रा.मांजरोद, ता.शिरपुर जि.धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शिवाजी नगरात राहणार्या अबुजर व अन्य विद्यार्थ्यांना रिक्षा चालक सचिन इधापे याने सकाळी साडे अकरा वाजता शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सोडले. त्यानंतर काही वेळातच राजेंद्र लोटन चौधरी हा मद्यपी तेथे आला. अबुजर याला पकडून तो समोरील दारुच्या दुकानात घेवून गेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मद्यपीला काही विद्यार्थ्यांनी मारहाण केली. त्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर अबुजरला शाळेत आणले. किरकोळ प्रकार असल्याने हा विषय कोणी गांभीर्याने घेतला नाही.पुन्हा आला शाळेतशाळेच्या काही मुलांनी मारहाण केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. नंतर काही वेळाने चौधरी हा पुन्हा शाळेत आला व अबुजरला तोंड दाबून बाहेर घेवून गेला. हा प्रकार नववीच्या विद्यार्थ्यांनी पाहिला, त्यांनी लागलीच त्याच्या दिशेने धाव घेत चौधरीच्या तावडीतून त्याची सुटका केली. यावेळी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याला पकडून ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीच पकडून ठेवलेगेल्या आठवड्यातील घटना लक्षात घेता मुख्याध्यापिका सुचिता तारे व काही विद्यार्थ्यांनी शहर पोलीस स्टेशनला झाल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे प्रीतम पाटील,संजय भालेराव व अकरम शेख यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी चौधरीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता त्याची ओळख स्पष्ट झाली. तो मद्याच्या नशेत असल्याने बडबड करीत होता. त्यामुळे खरोखरच अपहरणाचा उद्देश होता की नाही याचा उलगडा झाला नाही. अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाराजेंद्र चौधरी याच्यावर अपहरणाचा प्रयत्न केल्याचा कलम ३६३ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत त्याची चौकशी केली असता ठोस अशी काहीच माहिती त्याने दिली नाही. आपण साधू असल्याचेही तो पोलिसांना सांगत होता.