विद्यार्थ्यांची राजधानीत धडक
By Admin | Updated: August 3, 2015 23:11 IST2015-08-03T23:11:50+5:302015-08-03T23:11:50+5:30
पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’चे (एफटीआयआय) नवनियुक्त अध्यक्ष गजेन्द्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात

विद्यार्थ्यांची राजधानीत धडक
नवी दिल्ली : पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’चे (एफटीआयआय) नवनियुक्त अध्यक्ष गजेन्द्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी दिल्लीत धडक देत, जंतरमंतरवर निदर्शने केली. एफटीआयआयचे विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम असतानाच, हे केवळ राजकारण असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास राजकीय रंग देण्याचे प्रयत्न करीत असल्याचा ठपकाही सरकारने ठेवला आहे.
गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीस विरोध करीत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गत १२ जूनपासून आंदोलन उभारले आहे. चौहान यांना चित्रपटविषयक कुठलीही दृष्टी नाही. ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत केवळ म्हणून राजकीय वर्चस्वासाठी त्यांची या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)