विद्यार्थ्यांनी अनुभवले निवडणूक प्रशिक्षण
By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:00+5:302015-07-15T00:15:00+5:30
ओतूर : विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजली, मंत्रिमंडळ निवड यांचा अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतियुक्त प्रशिक्षण देऊन मंत्रिमंडळाची निवड ही सदस्य विद्यार्थ्यांमधून करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रामचंद्र तितर यांच्या वतीने रूपाली गायकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी अनुभवले निवडणूक प्रशिक्षण
ओ ूर : विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजली, मंत्रिमंडळ निवड यांचा अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतियुक्त प्रशिक्षण देऊन मंत्रिमंडळाची निवड ही सदस्य विद्यार्थ्यांमधून करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रामचंद्र तितर यांच्या वतीने रूपाली गायकर यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना रूपाली गायकर म्हणाल्या, 'या निवडणूक प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार दोन पॅनल बनविण्यात आली. प्रत्येक पॅनलला चिन्हही देण्यात आले. उमेदवारांसाठी त्यांचे नाव व चिन्ह असते ती मतपत्रिका देण्यात आली. या निवडणुकीत ज्याला दुसरी ते चौथीचे एकूण २९० विद्यार्थी मतदार होते. निवडणूक अधिकारी म्हणून हर्ष हांडे, शुद्धेश करालिया, यश मुरादे, विजय घराडे यांची नियुक्ती केली होती. शाळेतील एक वॉर्डात मतदार कक्ष उभारून मतदान फेरी ठेवण्यात आले. सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. २ वाजता संपूर्ण मतदान १०० टक्के झाले. प्रा. शाळा नं. १ चे विद्यमान कार्यरत शिक्षक लीला धिरडे, निर्मला गाढवे, सुरेखा डुंबरे, राजेंद्र आरोटे, अरुणा आरोटे, सुषमा वामन, रूपाली गायकर यांनी मतमोजणी केली व निवडणूक अधिकारी यांच्या वतीने निकाल जाहीर केला. या निवडणुकीत साद्री पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले. अतिशय खेळीमेळीत ही निवडणूक झाली. मुलांना प्रथमत: ओतूर शहरातील हज यात्रेकरुंचा सत्कार संस्थेचे सचिव वैभव तांबे यांनी केले. त्यानंतर विद्यालयातील इयत्ता ११ वी, १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा उपप्रमुख व मांडवी किनारा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी तांबे यांच्यातर्फे वावाटप करण्यात आले. श्री गजानन महाराज शिक्षण मंडळातर्फे मुस्लिम मुला-मुलींना ड्रेस मटेरियलचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शबाना मोमीन यांनी क्रीडासाहित्य, रुकय्या अजीज मोमीन गणित पेटी ईदी म्हणून वाटले.प्रतिभाताई पवार प्रशालेतील विद्यार्थिनींनी ईदीवाटप केले. शब्बीर शेख तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना खजूरवाटप केले. परवेज आलम शेख, परवीन इनामदार, नाजनीन मोमीन, अध्यक्ष विश्वासराव डुंबरे, प्राचार्य दिलीप बोबडे यांनी मनोगत व्यक्त केले.मुस्लिम बांधवांनी स्वर्गीय विलास तांबे यांनी मुस्लिम मुला-मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून स्थापनेपासून रमजान ईदनिमित्त ईदीवाटप करणारी ही एकमेव शाळा आहे, असे सांगून सर्वांना मुस्लिम बांधवांना व मुलामुलींना...